मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी येत्या २८ फेब्रुवारीला जाहीर केली जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.कर्जमुक्ती योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी लिंक करून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.शेतकºयांना कर्ज मुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, अचूकता यावी यासाठी टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यात येत असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. २८ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी जाहीर होईल. पहिल्या यादीमध्ये अद्याप तरी त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले नाही अशी माहिती त्यांनी दिली.
कर्जमाफीची दुसरी यादी उद्याच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 03:47 IST