शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासात न घेता वरिष्ठांनी जागा वाटप केले, जागा वाटपावरून काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह

By दीपक भातुसे | Updated: April 11, 2024 11:04 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ वरिष्ठ नेत्यांनी पदरात पाडून घेतले, तर पक्षाला विजयाची खात्री असणारे मतदारसंघ मात्र सोडून देण्यात आले, अशी भावना काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असून त्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

- दीपक भातुसेमुंबई - महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आणि केलेल्या जागा वाटपावर पक्षातूनच नाराजी वाढताना दिसत आहे. काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ वरिष्ठ नेत्यांनी पदरात पाडून घेतले, तर पक्षाला विजयाची खात्री असणारे मतदारसंघ मात्र सोडून देण्यात आले, अशी भावना काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असून त्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे मतदारसंघांचे वाटप करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासातच घेतले नसल्याचे समोर आले आहे.

महाविकास आघाडीत मुंबईतील जागा वाटपाची चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबई काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अथवा इतर नेत्यांनी मुंबईच्या जागांबाबत कोणतीच चर्चा केली नाही. उद्धवसेनेने दिलेल्या जागा निमूटपणे काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केल्याचा दावा मुंबई काँग्रेसमधील एका नेत्याने 'लोकमत'शी बोलताना केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे वर्षा गायकवाड तीव्र नाराज असून मंगळवारी जागा वाटप जाहीर झाल्यापासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. दोन दिवस काँग्रेसचे नेते त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे बुधवारी गायकवाड यांनीच मुंबई काँग्रेसच्या बोलवलेल्या बैठकीलाही त्या उपस्थित राहिल्या नाहीत, त्यामुळे ही बैठकही रद्द करावी लागली. जागा वाटपात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई काँग्रेसचा बळी दिल्याची भावना मुंबई काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

उत्तर मुंबईची जागा घेऊ नये अशी मागणी मुंबई काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती, मात्र नको असलेली आणि तिथे ताकद नसलेली उत्तर मुंबईची जागा काँग्रेसकडे घेण्यात आली. दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसची ताकद असताना ही जागा उद्धवसेनेसाठी सोडण्यात आल्याने मुंबई काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे.

दुसरीकडे सांगलीच्या जागेसाठी जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून आग्रह धरला असताना काँग्रेसच्या नेत्यांनी या जागेसाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची भावना जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. सांगलीत ताकद नसताना उद्धवसेनेने ज्या पद्धतीने सांगलीची जागेसाठी किल्ला लढवला, त्यापुढे काँग्रेसचे नेते कमी पडल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. भिवंडीबाबतही शरद पवार गटाच्या हट्टापुढे काँग्रेसच्या नेत्यांनी नांगी टाकल्याचे काँग्रेसमधील पदाधिकारी सांगत आहेत.काँग्रेसमधील ही परिस्थिती पाहता महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी आता काँग्रेसमधील हा अंतर्गत कलह मिटवण्याचे आवाहन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४