१ फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:45 PM2021-01-30T13:45:01+5:302021-01-30T13:46:07+5:30

Ration cards News राज्यात १ फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

Search for ineligible ration cards from February 1 | १ फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

१ फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

googlenewsNext

-अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीतील अनियमिता आणि गळती रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्याअनुषंगाने  महाराष्ट्र राज्यात १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत  अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी तब्बल २५ कोटी शिधापत्रिकांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.
 राज्य शासनाकडून बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केसरी, शुभ्र व आस्थापना कार्ड यावर्गवारीमध्ये तब्बल २४ कोटी ७ लक्ष ४१ हजार ७६४  शिधापत्रिका वितरीत केल्या आहेत.  या सर्वच शिधापत्रिकांची कोटकोरपणे तपासणी केली जाणार असून, त्यासाठी शासकीय कर्मचारी/ तलाठी यांची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे तपासणीअंती शिधापत्रिकांची दोन गटात विभागणी केली जाईल. यामध्ये छाननीनंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी ‘गट-अ’ म्हणून केली जाईल. तर ‘गट-ब’ मध्ये पुरेसा पुरावा न देणाºयांची नोंद घेतली जाणार आहे. सुमारे दोन महिने चालणाºया या शोध मोहिमेत  केंद्र शासनाकडून प्राप्त प्रत्येक निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय २८ जानेवारी रोजी राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.

 

Web Title: Search for ineligible ration cards from February 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.