शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भुसेंना बच्छाव, कांदेंना धात्रक पर्याय; बंडानंतर शिवसेनेकडून उमेदवारांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 08:23 IST

इच्छुकांशी संपर्क, बच्छाव यांचा मालेगाव तालुक्यातील सर्वच खेड्यांमध्ये जनसंपर्क असून, बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात यापूर्वीच केली आहे.

नाशिक : बंडखोर आमदार दादा भुसे व सुहास कांदे यांना आगामी निवडणुकीत पर्याय शोधण्याचा आदेश देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दोघा बंडखोर आमदारांचे परतीचे दाेर कायमस्वरुपी कापल्याचे मानले जात असून, पक्ष प्रमुखांच्या हुकूमाचे पालन करण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ सेना नेत्यांनी मालेगाव व नांदगाव मतदारसंघासाठी पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दादा भुसे यांना बंडू काका बच्छाव यांचा तर सुहास कांदे यांना मनमाडचे धात्रक हे पर्याय होऊ शकतात असा अंदाज सेनेकडून बांधण्यात येत आहे. याशिवाय अन्य नावांचीही चाचपणी केली जात आहे.  

राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जोमाने पक्ष बांधणीला प्राधान्य देत जिल्हा प्रमुख, शहरप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नांदगाव व मालेगाव विधानसभा मतदार संघासाठी पर्यायी उमेदवाराचा शोध घेण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. राज्यातील शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळेल अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली तर खुद्द ठाकरे यांनीही मध्यावधी निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अडीच वर्षांचा कार्यकाळ बाकी असल्याचे मानले जात असले तरी, संभाव्य निवडणूका लक्षात घेता सेनेने पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मालेगाव मतदारसंघातून पर्याय शोधण्याचे काम सुरू झाले असून, दादा भुसे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक बंडू काका बच्छाव यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सेनेच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून चाचपणीही केली आहे; मात्र बच्छाव यांनी तूर्त ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका मांडली असून, पुढे काय काय होते त्यानंतर निर्णय घेऊ असा शब्द त्यांनी सेनेच्या नेत्यांना दिल्याचे सांगण्यात आले आहे.

बच्छाव यांचा मालेगाव तालुक्यातील सर्वच खेड्यांमध्ये जनसंपर्क असून, बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात यापूर्वीच केली आहे. शिवाय भुसे यांच्या राजकीय विरोधकांचे बच्छाव यांच्याशी चांंगलेच सख्य असल्याने त्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. बच्छाव यांनी शेवटच्या क्षणी नकार दिला तर हिरे कुटुंबीयांचाही पर्याय सेनेने खुला ठेवला आहे. नांदगाव मतदारसंघातही शिवसेनेने शोध मोहीम सुरू केली आहे. आमदार सुहास कांदे यांनी काही वर्षातच या मतदारसंघावर आपली चांगली पकड निर्माण केल्याने नांदगाव शहरातून त्यांना पर्याय उपलब्ध होणे काहीसे अवघड असल्याचे मानून मनमाड शहरातून उमेदवार देता येईल काय याचीही चाचपणी केली जात आहे. त्यासाठी माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे पुत्र व मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांचे नाव पुढे आले आहे. या शिवाय माजी आमदार संजय पवार यांना देखील गळ घातली जाऊ शकते. सध्या पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, परंतु राजकारणात काहीही होऊ शकते यावर शिवसेना विश्वास ठेवून आहे. 

सध्यातरी ‘वेट ॲण्ड वॉच’ करू. मालेगाव तालुक्यातील जनता सर्व छक्के पंजे जाणून असून, आपण हिंदुत्व विचारसरणीचे आहोत, यापूर्वी खुनाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे भविष्यातील वाटचालीबाबत तूर्त काही सांगता येणार नाही; मात्र बारा बलुतेदार संघटना व जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांशी संपर्क कायम आहे. - बंडू काका बच्छाव

टॅग्स :Shiv Senaशिवसेना