शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पाककृतीमागे वैज्ञानिक सिद्धांत- डॉ. विजय भटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 03:44 IST

पाककलेमागे वैज्ञानिक सिद्धांत असल्याचे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.

पुणे : भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आहे. या पाककलांमध्ये शरीरविज्ञानाचा विचार खोलवर रुजलेला आहे. त्यामुळेच पचनसंस्थेत असलेल्या मायक्रोन्सपर्यंत पदार्थ पोहोचल्यानंतर त्या पदार्थाच्या चवीला उत्स्फूर्त दाद मिळते. पाककलेमागे वैज्ञानिक सिद्धांत असल्याचे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.नंदिनी पब्लिशिंग हाऊसतर्फे अनुराधा तांबोळकरलिखित ‘मेजवानी व्हेजवानी’ (भाग एक आणि दोन) या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, मास्टर शेफ नीलेश लिमये, मास्टर शेफ राहुल कुळकर्णी, लेखिका अनुराधा तांबोळकर, नंदिनी पब्लिशिंग हाऊसच्या संचालिका नंदिनी तांबोळी, डॉ. एन. जी. तांबोळकर, डॉ. अजित तांबोळकर आदी उपस्थित होते.डॉ. भटकर म्हणाले, ‘‘अध्यात्म आणि विज्ञान हा भारतीय पाककलेचा पाया आहे. ‘मेजवानी व्हेजवानी’ या पुस्तकाच्या माध्यमातून पाककलेचा विश्वकोशच तयार झाला असून हा एक प्रकारचा जागतिक विक्रमच आहे. पाककला हा विषय केवळ महिलांपुरताच मर्यादित न ठेवता शाळकरी वयापासून मुलाुमलींना विविध पदार्थ शिकवून त्यांना समृद्ध केले पाहिजे.’’या वेळी नंदिनी तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. लेखिका अनुराधा तांबोळकर यांनी पुस्तकलेखनामागील भूमिका विशद केली. प्रारंभी डॉ. संपदा तांबोळकर, कांचन तांबोळकर, अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि रजनी वेलणकर यांच्या हस्ते चुलीची आणि अन्नपूर्णेची पूजा करण्यात आली. या वेळी प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी अन्नपूर्णा स्तोत्र सादर केले. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले. तेजा पारुंडेकर यांनी आभार मानले.भारतीय खाद्य संस्कृती खूप समृद्ध असून ‘मेजवानी व्हेजवानी’ या पुस्तकामुळे या समृद्धीची व्याप्ती वाढली आहे. मागील दोन पिढ्यांचा हा वारसा आता पुस्तकाच्या रूपाने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचतोय, ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.- प्रदीप वेलणकर

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य