शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतील विज्ञानविषयक मासिके

By admin | Updated: January 29, 2017 00:26 IST

सन १८४० मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दिग्दर्शन’ हे विज्ञानविषयक मासिक सुरू केले. ते १८४६ साली त्यांच्या मृत्यूनंतर बंद पडले. पण त्यामुळे समाजाला विज्ञान विषयक लिखाण हवे आहे

- अ. पां. देशपांडे सन १८४० मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दिग्दर्शन’ हे विज्ञानविषयक मासिक सुरू केले. ते १८४६ साली त्यांच्या मृत्यूनंतर बंद पडले. पण त्यामुळे समाजाला विज्ञान विषयक लिखाण हवे आहे, हे ध्यानात आल्यावर, १८५० नंतर मराठीत मराठी ज्ञान प्रसारक, ज्ञान चंद्र्रिका, विविध ज्ञान विस्तार, सृष्टीज्ञान चंद्रिका, मासिक मनोरंजन, करमणूक अशी बरीच मासिके निघाली. वर उल्लेख केलेल्या मासिकातून साहित्याबरोबरच आरोग्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शेती, खगोल, भूगर्भ, भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित इत्यादी विषयांवर लेख छापून येऊ लागले. असे लेख लिहिणाऱ्या लेखकांत लोकमान्य टिळक, केरूनाना छत्रे, शं.बा.दीक्षित, प्राचार्य गो.रा.परांजपे , दि.धों कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रा.श्री.म.माटे, श्री.ह.रा.दिवेकर, प्रा.भालबा केळकर, श्री.के.रा.कानिटकर, डॉ.चिं.श्री.कर्वे, प्रा.प.म.बर्वे, प्रा.रा.वि. सोवनी, प्रा.ना. वा. कोगेकर, प्रा.चं. वि. तळपदे, वैद्य पु. स. हिर्लेकर, वैद्य पां.ह.देशपांडे, वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी, श्री.वा.रा.कोकटनूर आणि अगदी अलीकडच्या काळात, प्रा.जयंत नारळीकर, डॉ बाळ फोंडके, श्री.निरंजन घाटे, श्री.अ. पां. देशपांडे, शैलेश माळोदे, हेमंत लागवणकर यांनीही विपुल लिखाण केले. १८३० ते १९५० या १३० वर्षाच्या कालखंडात मराठीतून जे जे विज्ञानविषयक लेख छापले गेले, मग ते पुस्तकात असोत, की मासिकात, की वर्तमानपत्रात, त्यातील निवडक २०० लेख ४००-४०० पानांच्या दोन खंडात मराठी विज्ञान परिषद आणि विज्ञान प्रसार या केंद्र सरकारच्या संस्थेने सन २०११ मध्ये छापले आहेत. १९२८ साली पुण्यात सृष्टिज्ञान या नावाचे केवळ विज्ञानाला वाहिलेले मासिक, प्राचार्य गो. रा. परांजपे, प्रा. दि. धों. कर्वे आदी लोकांनी सुरू केले. ते मासिक आजही सुरू आहे. पुढे १९६६ सालापासून मराठी विज्ञान परिषद पत्रिका, उद्यम आणि विज्ञानयुग ही विज्ञानविषयक मासिके सुरू झाली. त्यातील आता उद्यम आणि विज्ञानयुग ही मासिके बंद पडली. ही मासिके विज्ञानाच्या सर्व विषयांवर लेख देत असत. पण विज्ञानाच्या एकेका विषयाला वाहिलेली अनेक मासिके आहेत. उदाहरणार्थ, शेतीवर शेतकरी, आपली शेती, बळीराजा इत्यादी तर आयुर्वेदावर आरोग्य मंदिर, आयुर्विद्या, आयुर्वेद पत्रिका अशी आहेत. खगोलावर नभांगण पत्रिका, खगोल अशासारखी मासिके चालू होती,मात्र त्यातील नभांगण पत्रिका आता बंद पडले.त्या त्या वेळी विज्ञान व्यक्त करण्यासाठी वापरल्या गेलेल्या मराठी भाषेचे नमुने पाहण्यासारखे आहेत. उदा.१९२८ साली सुरू झालेल्या सृष्टिज्ञान मासिकातील प्राचार्य गो. रा. परांजपे यांच्या लिखाणातील दोन उतारे खाली दिले आहेत, ते पाहण्यासारखे आहेत.हिरवे पान हा अन्नाचा कारखाना आहे. अन्न खाल्ल्यावर शरीरात बिनज्योतीचा जाळ पेटतो. शरीरात हालचाल सुरू होऊन शरीराला उबही मिळते. हालचाल म्हणजे जीवाची क्रिया. जीव हे सूर्यप्रकाश साठविल्याचे द्योतक. म्हणून जीव व अन्न एक आहेत. दुसरे उदाहरण पाहा, ध्वनी लहरी म्हणतात, मला बोलता येते पण चालता येत नाही, तर विद्युत लहरी म्हणतात, मला लांब चालता येते पण बोलता येत नाही. ध्वनी लहरी विद्युतलहरींच्या पाठीवर बसून आकाशातून हजारो मैल जाऊ शकतात. या अशक्त ध्वनीलहरी मोठ्या मनुष्याच्या खांद्यावर बसविलेल्या मुलाप्रमाणे जर दुसऱ्या कसल्यातरी जास्त ताकदवान व वेगवान अशा वाहकाच्या खांद्यावर चढवल्या...