शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची होणार राष्ट्रीय ’ गुणवत्ता संपादन चाचणी, अमरावती  जिल्ह्यात १६३ शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 18:06 IST

देशातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार देशातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते. हे गुणवत्तेच्या अनुषंगाने केले जाणारे राष्ट्रीय सर्वेक्षण असून जिल्ह्यातील निवडलेल्या १६३ शाळांमध्ये ही लेखी चाचणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ठळक मुद्दे निवडलेल्या १६३ शाळांमध्ये लेखी चाचणी, १३ नोव्हेंबर रोजी परीक्षाअभ्यासक्रमावर आधारित मूल्यमापन प्रक्रिया होणारपरीक्षांची तपासणी ओएमआर पद्धतीने होणारप्रत्येक तालुक्याचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावती : देशातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार देशातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते. हे गुणवत्तेच्या अनुषंगाने केले जाणारे राष्ट्रीय सर्वेक्षण असून जिल्ह्यातील निवडलेल्या १६३ शाळांमध्ये ही लेखी चाचणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शिक्षण विभागाने पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षाच नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पायाभूत चाचण्यांचा पर्याय शोधण्यात आला. ती गुणवत्ता तपासण्यासाठी देशातील सर्व राज्यांतील शाळांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

राज्यात जिल्हा परिषदेमार्फत गुणवत्ता वाढविण्यासाठी काम केले जाते. देशपातळीवर दिल्लीत ह्यन्यु प्राह्णतर्फे देशभरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकाही तयार केल्या आहेत. सीलबंद प्रश्नपत्रिका त्या-त्या शाळांच्या ठिकाणी पोहोचल्या असून परीक्षेच्या दिवशी ते फोडण्यात येतील. या चाचणीचे स्वरूप शिक्षक प्रश्नावली असे असणार आहे.

विद्यार्थ्यांसाठीच्या प्रश्नावलीत पर्यायी प्रश्नांचा समावेश असून प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्यायांना विद्यार्थ्यांनी गोल करणे अभिप्रेत आहे.

तिसरी, पाचवीसाठी ४५ गुण यामध्ये भाषा विषयासाठी १५ गुण, गणित विषयासाठी १५ आणि परिसर अभ्यास १५ गुण देण्यात येणार आहेत. तर आठवीसाठी ६० गुण यामध्ये भाषा १५ गुण, गणित १५, सामान्य विज्ञान १५ गुण, समाजशास्त्र १५ गुण असणार आहेत. तिसरी व पाचवीसाठी ९० ते १२० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राखीव आहे.

चाचणीच्या दिवशी शासकीय स्तरावरून स्वतंत्र होत पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांच्यामार्फत परीक्षा नियंत्रित केली जाणार आहे. या चाचणीसाठी पाचपेक्षा अधिक पटसंख्येच्या शाळांची चाचणीसाठी निवड केली आहे. यात जिल्ह्यातील १६३ शाळांची निवड केली आहे. यात तिसरी, पाचवीतील प्रत्येकी ६१, तर आठवीच्या ६१ शाळा आहेत. यात १७३ वर्गांचा समावेश आहे.स्वतंत्र अभ्यासक्रम नाहीया परीक्षेच्या निमित्ताने अभ्यासक्रम कोणता, असा प्रश्न शाळांना पडला आहे. या चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नाही. सर्व प्रश्न इयत्तेच्या क्षमतेवर आधारित असणार आहेत. त्यामुळे सध्या राबविल्या जात असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही मूल्यमापन प्रक्रिया होणार आहे.

या परीक्षांची तपासणी ओएमआर पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुक्याचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्य गुणवत्तेचे कोठे आहे, हे समजण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीeducationशैक्षणिक