शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार

By admin | Updated: December 3, 2014 00:43 IST

मित्रासोबत रात्री फिरायला निघालेल्या एका तरुणीवर पाच जणांनी चाकूच्या धाकावर सामूहिक बलात्कार केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कळमन्यातील घटना : आरोपींनी केली पोलीस असल्याची बतावणी नागपूर : मित्रासोबत रात्री फिरायला निघालेल्या एका तरुणीवर पाच जणांनी चाकूच्या धाकावर सामूहिक बलात्कार केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.पीडित तरुणी (वय २१) एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सोमवारी तिला सुटी होती. त्यामुळे तिने मित्रासोबत सकाळीच फिरायला जाण्याचा बेत बनविला. मात्र, मित्राला सायंकाळी ५ वाजता वेळ मिळाली. त्यानुसार तरुणी आपल्या अ‍ॅक्टिव्हाने नंदनवनमध्ये आली. तेथून हे दोघे स्वामी नारायण मंदिरात दर्शनाला गेले. दर्शन आटोपल्यानंतर हे दोघे अ‍ॅक्टिव्हाने महामार्गावर फिरायला गेले. विहीरगाव ते धारगाव रस्त्याच्या कडेला एकांतस्थळी ते गप्पा करीत असताना दोन दुचाकींवर पाच जण आले. ‘हम पुलीसवाले है’, असे म्हणत आरोपींनी या दोघांची चौकशी केली. त्यांना पोलीस ठाण्यात चला, असे सांगून एकाने त्या तरुणाला आपल्या दुचाकीवर बसवले. दुसऱ्या दोघांनी तरुणीच्या अ‍ॅक्टिव्हावर तिला मधात बसवले. त्यानंतर हे सर्व कापसी उड्डाणपुलाकडे निघाले. आरोपींनी शिवीगाळ करून तरुणाला मध्येच उतरवून दिले आणि तरुणीला घेऊन हुडकेश्वरकडे पळाले. वेळा गावाजवळच्या एका लेआऊटमधील निर्जन ठिकाणी पाचही जणांनी चाकूच्या धाकावर तरुणीवर पाशवी अत्याचार केला. नंतर तरुणीला तिच्या अ‍ॅक्टिव्हावर बसवून बेसा गावाजवळ आणून सोडले. कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेले. पोलिसांची शोधाशोध आरोपींच्या तावडीतून सुटलेल्या तरुणाने (पीडित तरुणीच्या मित्राने) लगेच रस्त्यावरच्या पोलिसांना मैत्रिणीच्या अपहरणाची घटना सांगितली. त्या पोलिसांनी नियंत्रण कक्षाला तर नियंत्रण कक्षाने कळमना पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार कळमन्याचा पोलीस ताफा ‘त्या’ तरुणाला सोबत घेऊन अपहृत तरुणीच्या शोधासाठी परिसरात धावपळ करू लागला. कळमना, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागोजागी नाकाबंदी करण्यात आली. रात्री ९.४५ च्या सुमारास तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तिने घरी पोहोचल्याचे मित्राला सांगितले. त्यानुसार, कळमना पोलिसांचा ताफा तिच्या घरी गेला. तिने सामूहिक अत्याचाराची घटना सांगताच पोलिसही हादरले. तिच्या पालकांसह पोलीस कळमना ठाण्यात पोहोचले. तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली. घटनास्थळच सापडेना पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून अपहरण, सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींची रात्रभर शोधमोहीम राबविली. तिला आज सकाळपासून दुपारी ३ वाजेपर्यंत पोलिसांनी कळमना, नंदनवन आणि हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीत फिरविले. मात्र, रात्री जेथे तिच्यावर सामूहिक अत्याचार झाला ते घटनास्थळच पीडित तरुणीला सांगता आले नाही. अंधारामुळे नेमकी अत्याचाराची घटना कुठे घडली, ते तिला पोलिसांना दाखवता आले नाही. वृत्त लिहिस्तोवर आरोपीही पोलिसांना गवसले नव्हते.पोलीस आणि आयकार्डया प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगारच असावेत, असा अंदाज आहे. या दोघांजवळ येऊन त्यांनी स्वत:ला पोलीस असल्याचे सांगितले. येथे अंधारात काय करता, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. तेव्हा तरुणीने धिटाई दाखवत त्यांना ‘आयकार्ड’ विचारले. यामुळे चिडलेल्या आरोपींनी तिला ‘चल तेरे को हम आयकार्ड बताते’, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. पीडित तरुणीची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली असता, तिच्यासोबत अत्याचार झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली.