शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक काेंडीत नाहकच अडकणार चिमुकले जीव; प्रदूषणाचाही सामना करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 06:48 IST

राज्यातील माेठ्या शहरांना वाहतूक काेंडी समस्येने ग्रासले आहे. सकाळी ८ वाजेनंतर वाहनांच्या संख्येत माेठी वाढ हाेते.

- प्रशांत बिडवेलाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : पूर्वप्राथमिक ते इयत्ता चाैथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेनंतर भरविण्यात येणार आहेत. शाळेची वेळ बदलल्याने स्कूल बस, व्हॅनचालकांचे विद्यार्थी विभागले जातील, तसेच फेऱ्यांतही वाढ करावी लागेल. त्यामुळे मासिक भाड्यातही तब्बल २५ ते ३० टक्के दरवाढ करावी लागणार आहे, असे स्कूल बस संघटनांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे पालकांच्या खिशाला झळ बसण्यासह दुसरीकडे चिमुकल्यांची वाहतूक काेंडीसह प्रदूषणाचा सामना करीत शाळेमध्ये वेळेत पाेहोचण्याची कसरत हाेईल. 

राज्यातील माेठ्या शहरांना वाहतूक काेंडी समस्येने ग्रासले आहे. सकाळी ८ वाजेनंतर वाहनांच्या संख्येत माेठी वाढ हाेते. याच वेळेत नर्सरी ते प्राथमिक शाळांत जाणाऱ्या स्कूल बस, व्हॅन, रिक्षा, दुचाकी वाहनांची भर पडल्यास वाहतूक काेंडीचा प्रश्न आणखी गंभीर हाेऊ शकताे, तसेच मुलांना शाळेमध्ये वेळेत पाेहोचविण्याचे आव्हानही चालकांसमाेर उभे ठाकणार आहे. नाेकरी करणाऱ्या पालकांसाठी हीच वेळ गडबडीची असल्याने त्यांचीही त्रेधातिरपीट उडणार आहे.

का हाेणार स्कूल बसची भाडेवाढ?nशाळेत ने- आण करण्याच्या फेऱ्या वाढतील.nवाहतूक काेंडीमुळे डिझेलवरील खर्चही वाढणार.nबस चालक, मावशींना ओव्हरटाइम पगार द्यावा लागेल.

‘सध्याची वेळ सर्वाेत्तम’शहरातील शाळांची सध्याची वेळ सर्वाेत्तम आहे. सकाळी ७ ते ८ या कालावधीत नर्सरी ते दहावीपर्यंतची मुले शाळेत पाेहोचतात. हे विद्यार्थी दुपारी १२ ते ५ या कालावधीत घरी परततात. या वेळेत वाहतूक काेंडीचा त्रास कमी हाेताे. माध्यमिक शाळेची वेळ वाढल्यास त्या विद्यार्थ्यांनाही वाहतूक काेंडीचा त्रास हाेईल, असे बसचालकांचे म्हणणे आहे.

प्राथमिक शाळेची वेळ सकाळी ९ वाजता निश्चित केली, तर विद्यार्थी कमी मिळतील. फेऱ्या वाढल्याने भाड्यातही वाढ करावी लागेल, तसेच शहरांमध्ये या वेळेत विद्यार्थ्यांना वाहतूक काेंडीचा सामनाही करावा लागेल.- संपत पाचर्णे, कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक महासंघ

टॅग्स :Schoolशाळा