शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांना अनुदानच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 03:38 IST

राज्यातील अनुसूचित जातींच्या मुला-मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या ३२२ केंद्रीय आश्रमशाळांना केंद्राकडून अनुदानच दिले नसल्याची कबुली सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

नागपूर : राज्यातील अनुसूचित जातींच्या मुला-मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या ३२२ केंद्रीय आश्रमशाळांना केंद्राकडून अनुदानच दिले नसल्याची कबुली सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी उत्तरात दिली आहे. ३२२ पैकी केवळ ३४ केंद्रीय आश्रमशाळांना केंद्र शासनाने अनुदान मंजूर केल्याचे बडोले यांनी सांगितले आहे. या ३२२ पैकी १६० शाळांना अनुदान देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. केंद्रीय निवासी आश्रमशाळांना अनुदान देण्यात येत नसल्याने संस्थाचालकांनी मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा एप्रिल महिन्यात दिला होता. या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह १७ सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या उत्तरात बडोले यांनी सांगितले की, केंद्र पुरस्कृत अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी आश्रमशाळा योजनेकरिता राज्य शासनाने शिफारस केलेल्या ३२२ पैकी फक्त ३४ आश्रमशाळांना अनुदान मंजूर झाले आहे. उर्वरित आश्रमशाळांना केंद्र शासनाने अनुदान मंजूर केले नसल्याने तसेच लोकप्रतिनिधींकडून अनुदान मिळण्याबाबत केलेली मागणी विचारात घेऊन या आश्रमशाळांकरिता राज्याची योजना तयार करून त्यांना अनुदान देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, असे मंत्री बडोले यांनी लेखी उत्तरात सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८