शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या निधीत घोटाळे; संचालक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 02:35 IST

विधानसभेत तीव्र पडसाद; सर्वपक्षीय आमदार एकवटले

मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखणे, त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी सरकारच्या निधीतून राबविण्यात आलेल्या कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पाचे (केम) तत्कालिन संचालक आणि सध्या कोकण विभागीय विकास उपायुक्त असलेले गणेश चौधरी यांना तत्काळ निलंबित करण्यात येत आहे, अशी घोषणा पणन मंत्री राम शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत केली.निधीत झालेल्या घोटाळ्यावरून विधानसभेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी सरकारला घेरले. भाजपचे डॉ. सुनील देशमुख, रणधीर सावरकर, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, अपक्ष बच्चू कडू यांनी या प्रकरणात घोटाळेबाजांना पाठीशी का घातले जात आहे, असा संतप्त सवाल केला.सरकार सगळ्यांना क्लीन चिट देत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला.२०१६-१७मध्ये या प्रकल्पात ९ कोटी ८८ लाख रुपयांचे घोटाळे झाले. त्यात डेअरी किट, फॉडर किट, लिझा किट, पशुधन विकास प्रशिक्षणातील घोटाळ्यांचा समावेश होता. २०१८ मध्ये १०३ कोटी रुपये खर्च झाले. चौधरी यांच्या कार्यकाळात घोटाळे होऊनही त्यांना अभय दिले जात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेवटी सभागृहाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन चौधरी यांना आजच्या आज निलंबित करण्याची घोषणा शिंदे यांनी केली.या प्रकरणी माझा समावेश असलेल्या समितीने चौकशी केली होती, तो अहवाल शासनाकडे आहे. विभागीय आयुक्तांनीही चौकशी केलेली आहे. असे असतानाची चौधरी यांना अभय दिले जात असल्याचा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला. केंद्र सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांना बरखास्त करण्याची भूमिका घेतली आहे. राज्यातही तसेच करा आणि त्याची सुरुवात या प्रकरणातील आरोपींना बरखास्त करण्यापासून करा, असे डॉ.सुनील देशमुख म्हणाले.सचिवांमार्फत कार्यवाही केली जाईलया प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करीत आहे, तिला गती देऊन चार दिवसांच्या आता संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यासाठी पणन सचिवांमार्फत कार्यवाही केली जाईल, असे राम शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या