शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्म्युला सांगा, वाट पाहू; प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:46 IST

आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहू. नाही तर आमची उमेदवारांची निवड सुरूच आहे, असा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत जागांचा मुद्दा हा चर्चेअंती सोडविला जाईल, असे सांगितले. 

मुंबई : ‘वंचित बहुजन आघाडी’चे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक असून, १२ जागांवर लढण्याचा फॉर्म्युला त्यांनी आघाडीला दिला आहे. आमचा फॉर्म्युला मान्य नसेल तर आमचे काही म्हणणे नाही; पण तुमचा फॉर्म्युला काय ते तरी सांगा? असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे. आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहू. नाही तर आमची उमेदवारांची निवड सुरूच आहे, असा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत जागांचा मुद्दा हा चर्चेअंती सोडविला जाईल, असे सांगितले. 

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच राज्यात दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, अडीच वर्षे महाविकास आघाडी सत्तेच्या बाहेर आहे. महाविकास आघाडीने या काळात ४० वेळा बैठका घेतल्या. एवढ्या बैठका होऊनही जेव्हा ४८ जागांचे वाटप होत नाही, त्यावेळी वेगळ्या चर्चांना उधाण येते. मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील; या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व भाजपची सरळ-सरळ लढत होणार असल्याचे दिसते. असे असले तरी आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाही हवी आहे. त्यामुळे भाजपला हरवणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले.

...तर शिवसेना-वंचित फिफ्टी-फिफ्टी लढूआघाडीबाबत आमचे शिवसेनेशी बोलणे झाले आहे. शिवसेनेची राष्ट्रवादी किंवा काँग्रेससोबत युती झाली नाही, तर आम्ही दोघेच फिफ्टी-फिफ्टी लढणार आहोत. २४ जागा ते लढतील. २४ जागा आम्ही लढू. त्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग ठरलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचे अंडरस्टँडिंग काय हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. त्यांनाच विचारा, असेही ते म्हणाले.

‘वंचित’ला सोबत घेतले पाहिजे: अशोक चव्हाण इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेतले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे; परंतु जागा किती द्याव्या लागतील, त्यांची इच्छा काय आहे, या सर्व गोष्टी चर्चेअंती स्पष्ट झाल्यानंतरच हा विषय सोडविला जाणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले. सोमवारी नांदेडमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राजकीय पक्ष दावे करतातच शिवसेनेने २३ जागांची मागणी केली आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय पक्ष जिंकतील वा हारतील हा त्यांचा निर्णय आहे. असे असेल तर भाजपने निवडणुका लढवू नये आम्हीच लढू, अशी काही भूमिका घेणार आहात का?, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणElectionनिवडणूक