शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:34 IST

Sawantwadi Assembly Election 2024 Result Live Updates: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधल मंत्री दीपक केसरकर यांनी बाजी मारली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधल मंत्री दीपक केसरकर यांनी बाजी मारली आहे. दीपक केसरकर यांनी एकतर्फी लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली यांना पराभवाचा धक्का दिला आहे. येथे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनीही येथे लक्षणीय मतं घेतली. तर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या अर्चना घारे परब ह्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत झाल्याने, तसेच मोठ्या प्रमाणावर अँटी इन्कम्बन्सी असल्याने दीपक केसरकर यांच्यासाठी निवडणूक ही आव्हानात्मक ठरणार असं बोललं जात होतं. त्यात केसरकर यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपामधून इच्छूक असलेल्या राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. तर भाजपाच्या विशाल परब यांनी बंडखोरी केल्याने केसरकर यांची वाट बिकट दिसत होती. मात्र आज झालेल्या मतमोजणीमध्ये दीपक केसरकर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. 

मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीअखेर दीपक केसरकर यांची आघाडी वाढत गेली. चौरंगी लढतीमध्ये मतांची विभागणी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात केसरकरांची मते एकगठ्ठा राहिली तर इतर उमेदवारांच्या मतांचं विभाजन झालं. अखेर २३ फेऱ्यांची मतमोजणी आटोपल्यानंतर दीपक केसरकर यांची आघाडी ३९ हजार ८९९ हजारांपर्यंत गेली. तर राजन तेली दुसऱ्या आणि विशाल परब हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sawantwadi-acसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर MahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाRajan Teliराजन तेली