शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video-सावंतवाडीत बिबट्याच्या बछड्याचा अमानुष छळ, प्राणी मित्रांना संताप अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 20:48 IST

बिबट्याच्या बछड्याला अगदी मांजराप्रमाणे दोरीच्या सहाय्याने बांधून खेळण्याचा प्रकार तालुक्यातील सातार्डा येथील एका गावात घडला आहे.

सावंतवाडी- बिबट्याच्या बछड्याला अगदी मांजराप्रमाणे दोरीच्या सहाय्याने बांधून खेळण्याचा प्रकार तालुक्यातील सातार्डा येथील एका गावात घडला आहे. त्यात तो छोटा बछडा जिवाच्या आकांताने ओरडताना दिसत आहे. या प्रकाराची  क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्सअपवर आलेल्या क्लिपमध्ये बिबट्याच्या छोट्या बछड्याला दोरीने बांधून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर बाजूला बसलेले लोक त्याला बांधून उचलत आहेत. तसेच मांजराप्रमाणे त्याला खेळविले जात आहे. त्यामुळे नेमके त्याचे काय झाले याचा शोध घ्यावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.याबाबत वनअधिका-यांशी संपर्क साधला असता तो प्रकार चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात घडला. मात्र बांधून ठेवण्यात आलेल्या बछड्याला उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, असे त्यांचे सांगण्यात आले आहे. परंतु जखमी बछड्याला जखमी अवस्थेत थेट जंगलात सोडणे चुकीचे आहे. त्याचं नेमकं काय झालं याची चौकशी व्हावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. मात्र या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तालुक्यातील सातार्डा येथे एका गावात हा प्रकार घडला होता. पकडण्यात आलेल्या बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. अशा प्रकारे कोणी वन्य प्राण्यांची खेळू नये ते कायद्याने चुकीचे आहे. याची चौकशी सुरू आहे, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.