शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांना सावित्रीमाईंचे नाव! पुरस्कार प्रक्रिया होणार अधिक पारदर्शी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:16 IST

पुरस्कारासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार आलेल्या प्रस्तावांची छाननी केली जाणार आहे. ते राज्यस्तरावर पाठविण्यासाठी जिल्हा समिती, राज्यस्तरावर आवश्यक निकषानुसार अंतिम निवडीबरोबरच ते शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यासाठी राज्य समितीची स्थापना करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. 

मुंबई : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या निकषात बदल करून हा पुरस्कार यापुढे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. बदललेल्या निकषानुसार या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षण विभागाने नेमून दिलेली विविध कार्य, उपक्रम, मूल्यमापन यासाठी १०० गुणांचे १७ निकष पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. याशिवाय साधारणतः मे महिन्यात शिक्षकांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, पुढील वेळापत्रकाप्रमाणे सप्टेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षण विभागाने काही अटी निश्चित केल्या असून त्यातील सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे शिक्षकांनी सादर केलेले पुरावे हे मुख्याध्यापकांनी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक असणार आहे. याशिवाय शिक्षक, मुख्याध्यापकाची सेवा ही सलग किमान १० वर्षे असणारे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी शिक्षकाचे मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवालही विषयक राहणार असून त्यावर कोणतीही विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. प्रतिनियुक्तीवरील शिक्षकाला या पुरस्कारासाठी पात्र ठरविता येणार नसून त्याच्या सेवेतील कार्यपद्धती आणि तो निर्व्यसनी असल्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्रही यासाठी आवश्यक असणार आहे. त्यामुळे यापुढे आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी आदर्श अशाच शिक्षकांची निवड केली जाईल, तसेच याबाबतची निश्चितताही मिळेल, असा आशावाद व्यक्त करत शिक्षकांमधून सकारात्मक  प्रतिक्रिया उमटत आहेत. 

एकूण १०९ पुरस्कार प्राथमिक , माध्यमिक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक, विशेष कला / क्रीडा शिक्षक , दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक. स्काऊट / गाईड अशा विविध प्रवर्गातील एकूण १०९ पुरस्कार या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शाळांना दिले जाणार आहेत.

प्रस्तावांच्या छाननीसाठी समित्या -  पुरस्कारासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार आलेल्या प्रस्तावांची छाननी केली जाणार आहे. ते राज्यस्तरावर पाठविण्यासाठी जिल्हा समिती, राज्यस्तरावर आवश्यक निकषानुसार अंतिम निवडीबरोबरच ते शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यासाठी राज्य समितीची स्थापना करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. -  शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या सात सदस्यीय राज्य निवड समितीमार्फत अंतिम निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याची पूर्ण जबाबदारी शिक्षण आयुक्तालयातील ई गव्हर्नन्सची असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेTeacherशिक्षक