तेजपालला 27 जूनर्पयत दिलासा

By Admin | Updated: June 3, 2014 22:55 IST2014-06-03T22:55:15+5:302014-06-03T22:55:15+5:30

सर्वोच्च न्यायालयाने तरुण तेजपालच्या अंतरिम जामिनाची मुदत 27 जूनर्पयत वाढवली आहे.

Satyagraha by June 27 | तेजपालला 27 जूनर्पयत दिलासा

तेजपालला 27 जूनर्पयत दिलासा

>पणजी : सर्वोच्च न्यायालयाने तरुण तेजपालच्या अंतरिम जामिनाची मुदत 27 जूनर्पयत वाढवली आहे. सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला तेजपाल याने आपल्याला जामिनाला आणखी सहा आठवडय़ांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती. 
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. एस. खेहर आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठासमोर याचिका सुनावणीस आली. तेजपालच्या आईचे निधन झाल्याने क्रियाकर्म करण्यासाठी त्याच्या अंतरिम जामिनाचा कालावधी वाढविण्यात आला. या प्रकरणाचे तपासकाम पूर्ण झालेले असल्याने आता तेजपालच्या कोठडीची काय गरज आहे, असा सवाल न्यायालयाने केला. 
गोवा पोलिसांच्यावतीने वकिलाने जामिनाची मुदत वाढवून देण्यास विरोध केला. मोकळा सोडल्यास तेजपाल साक्षीदारांना फूस लावू शकतो तसेच पुरावेही नष्ट करु शकतो, अशी भीती पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली. 19 मे रोजी तेजपालला न्यायालयाने मातेवर अंत्यसंस्कारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता परंतु तो अंत्यसंस्कारास उपस्थित राहू शकला नाही याकडेही त्याच्या वकिलाने न्यायालयाचे लक्ष वेधले. (प्रतिनिधी) 

Web Title: Satyagraha by June 27