शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तारांनी भाजपप्रवेशाची इच्छा व्यक्त केलीच नाही; दानवेंचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 11:36 IST

काँग्रेसचे हात सोडून अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे बातम्या माध्यमात आल्यानंतर सत्तार यांनी सुद्धा आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला होता.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत उमदेवारी न दिल्याने नाराज असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते.  मी भाजपमध्ये जाणार आणि मला मंत्रिपद सुद्धा मिळणारच असा दावा करणाऱ्या  सत्तारांबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. सत्तार यांनी भाजपप्रवेश करण्याबद्दल इच्छा व्यक्त केलीच नसल्याचे दानवे म्हणाले आहे. औरंगाबादमध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

काँग्रेसचे हात सोडून अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे बातम्या माध्यमात आल्यानंतर सत्तार यांनी सुद्धा आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला होता. विशेष म्हणजे सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सुद्धा भेट घेतली होती. मात्र त्यांच्या प्रवेशाला सिल्लोडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना 'नो एन्ट्रीचा' सिग्नल दिला. तर सत्तार यांनी भाजपप्रवेश करण्याबद्दल इच्छाच व्यक्त केली नसल्याचा दावा आता दानवे यांनी केला आहे.

भाजपमध्ये विरोध लक्षात घेता सत्तार हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा अलीकडील काळात पहायला मिळाली. या काळात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती. मात्र याबाबतीत शिवसेनेकडून अधिकृत खुलासा करण्यात आला नाही. तर भाजपमध्ये होत असलेला विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेतून सत्तार यांना सेनेत घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.