शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा मुख्यमंत्रिपदाचा चौकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 08:21 IST

हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी राहिले. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते.

नितीन काळेल -सातारा : या जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा नवीन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. एकनाथ शिंदे हे जिल्ह्यातील चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत. शिंदे हे ठाण्यातून निवडून येत असले तरी ते मूळचे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब गावचे आहेत.

यशवंतराव चव्हाणहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी राहिले. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्याचवेळी चीनने भारतावर आक्रमण केल्याने तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चव्हाण यांना दिल्लीत बोलावून संरक्षणमंत्री केले. 

बॅ. बाबासाहेब भोसले २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ असा त्यांचा कार्यकाळ राहिला. भोसले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कलेढोण (ता. खटाव) गावचे. भोसले हे सातारा  जिल्ह्यातील दुसरे मुख्यमंत्री ठरले. 

पृथ्वीराज चव्हाण  चव्हाण हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले. १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ असा त्यांचा कार्यकाल राहिला. चव्हाण यांनी तत्कालीन कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केले होते. 

एकनाथ शिंदे शिंदे यांनी महाराष्ट्राचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली. शिंदे हे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.  ठाकरे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.  

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवार