शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ससून रुग्णालय दर्जेदारच...! मंत्री म्हणाले, आमदारांना प्रत्यक्ष नेऊन दाखवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:27 IST

येत्या मंगळवारी ससून रुग्णालय या विषयावर लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली जाईल

मुंबई - पुण्यात अलीकडे अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या ससून रुग्णालयाबाबतच्या प्रश्नावर बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या रुग्णालयाचा दर्जा आजही अत्यंत चांगला असल्याचा दावा करून ज्यांची इच्छा आहे अशा सर्व आमदारांना त्या ठिकाणी नेऊ आणि हे दाखवून देऊ, असे विधानसभेत गुरुवारी सांगितले.

ससून रुग्णालयाला सुविधा उपलब्ध करून देणे आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासंदर्भातील प्रश्न भाजपचे भीमराव तापकीर व अन्य सदस्यांनी विचारला होता. मुश्रीफ यांनी या संदर्भात माहिती दिली. 

कर्करोग युनिट उभारणार...ससूनमध्ये कर्करोग रुग्णालय लवकरच उभारले जाईल. त्यासाठी समोरच असलेली एमएसआरडीसीची जागा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपल्या विभागाची चर्चा झाली आहे, ती जागा नक्कीच मिळेल. ससूनमध्ये नवजात शिशूंसाठींच्या बेडची संख्या कमी आहे, ती वाढविली जाईल, असेही मुश्रीफ म्हणाले. ललित पाटील या आरोपीला केलेले सहकार्य, पोर्शे दुर्घटनेतील मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले जाणे, उंदीर चावल्याने रुग्णाचा झालेला मृत्यू या घटनांमुळे ससून रुग्णालयाची बदनामी झाली आहे, हे मुश्रीफ यांनी मान्य केले. 

‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेखससून रुग्णालय माफियांचा अड्डा बनले आहे, गुन्हेगारांच्या मुक्कामाचे ठिकाण बनले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ससूनमधील असुविधा, पुणे महापालिकेला आरोग्य प्रमुखच नसणे आदी मुद्दे उपस्थित करत रवींद्र धंगेकर यांनी या संदर्भात ‘लोकमत’ने दिलेल्या बातम्यांचा उल्लेख केला. ससूनमध्ये बाहेरून औषधे खरेदी करायला सांगितले जाते याकडे सदस्यांनी लक्ष वेधले असता मुश्रीफ यांनी त्याचा इन्कार केला. 

लक्षवेधी मंगळवारी, होणार सविस्तर चर्चाससूनमधील घटनांसंदर्भात राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत, याबाबत सांगण्यासारखे खूप काही आहे. त्यामुळे या विषयावर स्वतंत्र लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली जावी म्हणजे मला विस्ताराने उत्तर देता येईल, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही त्यासाठी आग्रह धरला. त्यावर, येत्या मंगळवारी या विषयावर लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफsasoon hospitalससून हॉस्पिटल