पुणे : सर्वोदय चळवळीत दीर्घकाळ काम केलेले व आचार्य विनोबा भावे यांच्याबरोबर भूदान चळवळीत सहभागी असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव चंदावार (८२) यांचे रविवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, कन्या व दोन मुले असा परिवार आहे.वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंदावार यांनी भूदान चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.बिहारमध्ये भूदान चळवळीत ३१ लाख एकर जमीन मिळाली होती. त्याच्या वितरणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.भूदानाबरोबरच ग्रामदान चळवळीतही त्यांनी योगदानदिले होते. १९७३ पासून तेजयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या चळवळीत सक्रीय होते. आणीबाणीत त्यांना कारावासही झाला होता. ते दीर्घकाळ वर्धा येथील सेवाग्राम व बिहारमध्ये भूदान चळवळ यशस्वी झालेल्या क्षेत्रात विकास कामांच्या अंमलबजावणीत व्यग्र होते. गेले काही दिवस ते पुण्यात राहत होते. (प्रतिनिधी)
सर्वोदयी कार्यकर्ते बाबुराव चंदावार यांचे निधन
By admin | Updated: August 1, 2016 04:28 IST