शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सारथी संस्था बंद पडता कामा नये : खासदार छत्रपती संभाजी राजे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 19:14 IST

सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची  चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देसारथीची स्वायत्तता कशी हाणून बंद पाडता येईल याचा प्रयत्न सुरू मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितलेकोणताही भ्रष्टाचार केलेला नाहीसंभाजी राजे यांनी आज सारथी कार्यालयात घेतली बैठक

पुणे :  छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी) राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी 'सारथी' संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ही संस्था टिकून राहण गरजेचे आहे. सारथी बंद होता कामा नये ही भूमिका राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली आहे.      मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. त्यासंदर्भात संभाजी राजे यांनी आज सारथी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत  व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार,   प्रभारी  व्यवस्थापकीय संचालक विजया पवार, राजेंद्र कोंढरे, राजंद्र कुंजीर, शांताराम कुंजीर, सारथीतील कर्मचारी, विद्यार्थी, मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.     छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्याची चौकशी व्हावी पण ती प्रामाणिकपणे व योग्य अधिकाऱ्यांमार्फत होणे गरजेचे आहे. सारथी संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले आहे. मोठ्या संर्घषांतून ही संस्था जन्माला आली आहे. सारथीची स्वायत्तता कशी हाणून बंद पाडता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. परंतू,  प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.  मराठा समाजातील गरीबांचा गरजूंचा  फायदा होण्यासाठी ही संस्था निर्माण झाली आहे. तो मूळ हेतू बाजूला राहता कामा नये. अधिकाऱ्यांच्या  नियुक्त्यांवरून आणि नियुक्ती पत्रांवरून वाद  सुरू आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सध्या कोणतेही निर्णय घेऊन नये त्यांतून वाद चिघळत आहे, असे छत्रपती संभाजी राजेंनी अधिकाऱ्यांना सांगितले. ...................................................................................................      कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही डी. आर. परिहार म्हणाले की, मी कोणाताही भ्रष्टाचार केलेला नाही.माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. बार्टी संस्थेच कार्यरत असतांना मी कोणत्याही गाड्या खरेदी केल्या नाहीत. माझा अपमान करण्यात येत आहे. व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविला असून, कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. ...................................................................................................

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाGovernmentसरकार