शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

JOB Alert: सारस्वत बँकेत नोकरीची संधी; अर्ज करण्यास उद्या शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 16:58 IST

Saraswat Bank BDO Application 2021: सारस्वत बँकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पदांसाठी मान्यताप्राप्त विश्वविद्यालय किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थांकडून कमीत कमी 50 टक्के गुणांनी कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे.

सरकारी बँकांमध्ये गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आली. यामध्ये ज्यांना संधी मिळाली नाही किंवा ज्यांना बँकेचीनोकरी हवी आहे त्यांच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये (Saraswat Bank BDO Application 2021)  बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरच्या 150 जागा भरायच्या आहेत. या पदांसाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. (Recruitment in Saraswat Bank BDO 150 post.)सारस्वत बँकेच्या विविध झोनमध्ये मार्केटिंग, सेल्सचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी 31 मार्च, 2021 ही अखेरची तारीख आहे. saraswatbank.com वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 17 मार्च 2021 ला सुरु झाली होती.

सारस्वत बँकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पदांसाठी मान्यताप्राप्त विश्वविद्यालय किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थांकडून कमीत कमी 50 टक्के गुणांनी कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे. उमेदवारांकडे कोणत्याही बँकेमध्ये किंवा एनबीएफसीमध्ये सेल्स किंवा मार्केटिंग विभागातील कमीतकमी एक वर्षाचा अनुभव असायला हवा. याशिवाय उमेदवाराचे वय 1 फेब्रुवारीला 21 ते 27 वर्षांच्या आतमध्ये असायला हवे. 

निवड प्रक्रिया...सारस्वत बँकेमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट पदांसाठी ऑनलाईन परिक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. ऑनलाईन परिक्षेत सामान्य/ आर्थिक ज्ञान, इंग्रजी आणि कॉम्प्युटर अॅप्टीट्यूड, प्रोफेशनल नॉलेज संबंधी एकूण 190 प्रश्न विचारले जाणार आहेत. या परिक्षेत कमीतकमी 50 टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना मेरिटनुसार नोकरी देण्यात येणार आहे.  

टॅग्स :bankबँकjobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र