शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचे प्रतीक सारस लुप्त होण्याच्या मार्गावर; मागील वर्षीच्या तुलनेत संख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 11:18 IST

सारस पक्ष्यांचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात त्यांच्या संख्येत घट हाेत असल्याने सारसचा माळढोक होण्याची शक्यता बळावली आहे.

गोंदिया :

सारस पक्ष्यांचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात त्यांच्या संख्येत घट हाेत असल्याने सारसचा माळढोक होण्याची शक्यता बळावली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत संख्येत घट झाली असून, संवर्धनासाठी वेळीच पावले उचलली नाही तर प्रेमाचे प्रतीक असलेले सारस पक्षी लुप्त होण्याची  शक्यता नाकारता येत नाही. पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार व वन्यजीव, वनविभाग आणि पर्यावरण प्रेमींच्या पुढाकाराने जिल्ह्यात १२ ते १६ जून दरम्यान सारस गणना करण्यात आली. गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यातील अनुक्रमे ७० आणि ८० ठिकाणी संस्थेचे सदस्य, स्थानिक शेतकरी, सारस मित्र आणि वनविभाग गोंदिया व बालाघाटच्या कर्मचाऱ्यांनी गणना केली. पक्ष्यांच्या आरामाच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर पहाटे ५ वाजेपासून सकाळी १० वाजेपर्यंत थेट जाऊन गणना करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात ३४ पक्ष्यांची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यात  गोंदिया, तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगाव या तालुक्यांतर्गत एकूण ६४ ठिकाणी सारसचा अधिवास आहे. मागील वर्षीच्या गणनेत ३९ पक्ष्यांची नोंद झाली होती. मात्र, यंदा ५ सारस कमी झाले आहेत.७० टीमद्वारे गणना गणनेवर शंका नको म्हणून सारस पक्ष्यांच्या अधिवास असलेल्या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शेतात, तलावात, नद्यांमध्ये जाऊन स्थानिक लोकांशी संवाद साधण्यात आला. प्रभारी अभिजित परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली बालाघाट जिल्ह्यातील ६० ते ७० ठिकाणी २१ गट (टीम) द्वारे गणना करण्यात आली.

या परिसरात झाली गणना गणना करण्यासाठी एकूण ४२ चमू तयार करण्यात आल्या. या चमूमध्ये जिल्ह्यातील सेवा संस्था, हिरवळ बहुउद्देशीय संस्था, गोंदिया निसर्ग मंडळ, सातपुडा फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे एकूण ९२ स्वयंसेवक, सारस मित्र तसेच गोंदिया वनविभागातील ५० वनकर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

सारस पक्ष्यांची घटती संख्या लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून याचिका दाखल  करून  सारस संवर्धनासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यानंतर प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या नावावर केवळ पुस्तक छापले.  जिल्हानिहाय संख्या - गोंदिया : ३४ - बालाघाट : ४५ - भंडारा : ०३

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य