शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

#सरळस्पष्ट मुंबईची तहान भागवणारी गावेच तहानलेली…राजकारणी गाढ झोपलेले!

By तुळशीदास भोईटे | Updated: April 2, 2018 19:14 IST

मुंबई ठाणे या महानगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवलीच जात नाही. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र हाल काढावे लागतात. तरीही पाणी मिळत नाही. जबाबदार राजकारणी तर गाढ झोपेतच असल्यासारखे दिसते.

पाण्याचा भरलेला ग्लास...हाती येतो...काही वेळा अवघा एक घोट घेऊन आपण तो तसाच सोडून देतो...काही सेकंदात हे सारं घडतं...बादलीभर पाणी...हंडाभर पाणी...तेही आपण काही सेकंदात फेकून देतो...मात्र त्याच बादलीभर...हंडाभर पाण्यासाठी काहींचा दिवसच नाही तर रात्रही जात असते...घोटभर पाणी मुखी लागावं यासाठी काहींना जीवाचा धोकाही पत्करावा लागतो...उगाचच काही तरी सनसनाटी सांगून तुम्हाला आम्ही खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करीत  नाही आहोत...हे सारं घडतंय...ते आपल्या राजधानी मुंबईतील मंत्रालयापासून अवघ्या ऐंशी किलोमीटरवर.... मंत्रालयातून दावे काहीही केले जावोत...पण हे भीषण वास्तव आहे...

हे वास्तव केवळ एका गावापुरते मर्यादित नाहीय...लोकमत न्यूज नेटवर्कचे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांनी दिल्लीतून मिळवलेली आकडेवारी महाराष्ट्रातील पाणीबाणीची व्यापकता आणि गंभीरताही स्पष्ट करतेय...

 

महाराष्ट्रात पाणीबाणी

  • महाराष्ट्रातील गावांची एकूण संख्या    -   ४३, ६६५
  • पाणीटंचाईग्रस्त अर्ध्याहून जास्त – अंदाजे   २२,०००+
  • पाणीटंचाईग्रस्त खेडी                २६, ३४१
  • पाणीटंचाईग्रस्त वस्त्या             १२, ९५६

 

अर्ध्याहून जास्त महाराष्ट्राला ग्रासणाऱ्या पाणीबाणीचा वेध सातत्याने घेत www.lokmat.com सरळ-स्पष्ट वास्तव जसं आहे तसं मांडणार आहे...तुम्हाला वाटेल एसीमधून बाता मारल्या जातायत का...तर तसं नाही...हे जिथं आहे तिथं थेट जाऊन घेतलेला वेध...जमिनीवरचं दाहक वास्तव...स्वत: अनुभवून मांडलेलं...

 

मुंबईपासून अवघ्या ऐंशी किलोमीटर अंतरावर...पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका...ओंदे गावातील...जनाठे पाडा...पाणीबाणी असलेल्या महाराष्ट्रातील तेरा हजार वस्त्यांपैकी एक...तळपत्या उन्हात मी तेथे पोहचलो तेव्हा एवढं भीषण वास्तव पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं...

 

गावकरी पाणी कुठून भरतात असं विचारलं तेव्हा दूरवर बोट दाखवण्यात आलं...तेथे निघालो...रस्त्यात एक महिला तिच्या मुलांसह पाणी भरायला जाताना दिसली...तिच्याच मागे गेलो...विहिर आली...अरे पण हे काय...विहिरीत पाणी आहे तरी कुठे...तिनेच दाखवले...खोल खोल पाणी...म्हणजे तळाशी खडकांमध्ये साचलेलं डबक्यासारखं....

पाणी मिळवण्यासाठी दिवस रात्र झगडावं लागतं...ठेचाळत...धडपडत...अगदी जीव धोक्यात टाकावा लागतो...पाणी म्हणजे जीवन...जीवनासाठीच जीवन धोक्यात...

जे आधी आले त्यांना किमान तेव्हढं तरी पाणी मिळालं...काहींना तसंच परतावं...लागलं....त्यांच्याकडेही पाणी होतं...पण भांड्यात नाही...तर डोळ्यात...गच्च भरलेलं!

पालघर हा जिल्हा मुंबई-ठाणे परिसराला पाणी पुरवणारा जिल्हा...त्या जिल्ह्यातील पाणीबाणीबद्दल पालकमंत्री विष्णु सावरा हे सरकारी यंत्रणेची पाठ थोपटताना दिसतात. गेल्या वर्षापेक्षा आता टँकर कमी झाले. तरीही कुठे पाणी कमी पडू देणार नाही, यंत्रणेला तसं सांगितल्याचाही दावा करतात. पण ते सांगताना आपल्याच विक्रमगड मतदारसंघातील ओंदे ग्रामपंचायतीच्या हद्दीत जनाठेपाडा ही वस्ती आहे. त्या वस्तीत पाण्यासाठी गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालावा लागतोय हे त्यांच्या गावीही नसावे!

मंत्रालयातील कागदावरील माहिती बिनदिक्कत मांडणारे आपले मंत्री कधी हे समजून घेतील की त्यामुळे ते भ्रामक वास्तव तयार करु शकतील...पण त्यांचं हे कागदावरचं पाणी सामान्यांची तहान कशी भागवणार?  

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळpalgharपालघरvishnu savaraविष्णू सावरा