बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांच्यानंतरचा प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याने सीआयडीला दिलेला जबाब हाती लागला आहे. यामध्ये त्याने प्रतीक घुले यानेच सरपंच देशमुखांच्या तोंडावर लघवी केली. त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या छातीवर उडी मारली. त्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली, असेही म्हटले आहे. तसेच मारहाण करतेवेळी दोन वेळा विष्णू चाटे याच्याशी मोबाईलवरून बोलणे झाल्याचेही त्याने कबूल केले आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे असे एकत्र आले आणि सरपंच देशमुख यांच्या अपहरणाचा प्लॅन झाला. कृष्णाने एक कार भाड्याने आणली होती. तर सुदर्शनकडे अगोदरच काळी जीप होती. देशमुख आणि त्यांचा मावसभाऊ दोघेजण कारमधून येत असल्याचे दिसताच एक मागे आणि दुसरी पुढे अशा दोन्ही गाड्या लावून त्यांना अडविले. त्यानंतर दगडाने काच फोडून सरपंचाला बाहेर काढले. गॅसच्या पाईपने मारहाण केली. तर सोबतच्याला कोयत्याचा धाक दाखवून दुपारी ३ वाजता उमरी टोलनाक्यावरून देशमुखांचे अपहरण केले. त्यानंतर त्याला टाकळी शिवारात नेऊन मारहाण केली. यात सरपंचाचा मृत्यू झाला.
अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपलेसंतोष देशमुख यांना मारहाण केल्याने ते निपचित पडले होते. ते मयत झाल्याचा त्यांचा संशय होता. त्यामुळे जयराम चाटे याला देशमुखांना कपडे घालण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना गाडीत बसवून आम्ही सर्व तुरीच्या शेतात लपून अंधार पडण्याची वाट पाहत होतो. अंधार पडताच मृतदेह दैठणा फाटा येथे टाकून देत वाशीच्या दिशेने निघून गेलोत, असेही सुदर्शन घुलेने म्हटले आहे.
वाल्मीक कराडचा निरोपखंडणी न दिल्यानेच वाल्मीक कराड याने आडवे येणाऱ्याला आडवे करा असा निरोप दिला होता. त्याप्रमाणेच आम्ही सरपंचाला मारहाण केली. याचवेळी विष्णू चाटे याला जयराम चाटेच्या फोवरून दोनदा बोलणे झाल्याची कबुली सुदर्शनने दिली. इकडे धनंजय देशमुख यांना हाच विष्णू चाटे तुमचा भाऊ परत येईल, असे सांगून थांबण्यास सांगत होता.
दोन तास मारहाणक्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप, लाकडी काठी अशा हत्यारांनी आम्ही सर्वजण दोन तास देशमुख यांना मारहाण करत होतो, असेही सुदर्शन घुले याने कबुली दिली आहे.
गित्ते गँग हर्सूलला आता आठवले गँगलाही नाशिकला हलविलेबीड येथील कारागृहात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची चर्चा सोमवारी झाली होती; परंतु कारागृह प्रशासनाने असे काहीही झाले नाही, असा दावा केला होता. त्यानंतर सायंकाळी परळीच्या महादेव गित्तेसह सहकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात पाठविले, तर मंगळवारी सकाळी मकोकातील आठवले गँगलाही नाशिकच्या कारागृहात हलविण्यात आले आहे. सुरक्षेसाठी या उपाययोजना केल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांच्यासह सात आरोपी हे बीडच्या कारागृहात आहेत. परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील बबन गित्ते गँगमधील महादेव गित्ते आणि बीडमधील मकोका लागलेल्या आठवले गँगमधील आरोपी हेदेखील बीडच्या कारागृहातच आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता सर्वजण बाहेर काढल्यानंतर मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर सायंकाळी गित्ते गँगमधील चौघांना तातडीने हर्सूलला हलविले. त्यानंतर आता मंगळवारी सकाळी अक्षय आठवले आणि गँगला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविले आहे.
दोन आरोपींवर गुन्हा दाखलसोमवारी सुधीर सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांनी वाद केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शिपाई संतोष नवले यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली.
कारागृह प्रशासनावर संशयसुधीर सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाल्याचा दावा बीडच्या कारागृह प्रशासनाने केला. जर वाद या दोघांत झाला तर त्यांना हलवणे अपेक्षित होते; परंतु असे न करता गित्ते गँग आणि आठवले गँग यांनाच हलविण्यात आले. नेमका वाद कोणात झाला? हा प्रश्न अनुत्तरित आहे.फरार बबन गित्ते सोशल मीडियावर सक्रिय : बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्ते हा अजूनही फरार आहे. तो सापडत नसल्याचा दावा बीड पोलिस करत आहेत; परंतु हाच बबन गित्ते सोशल मीडियावर सक्रिय असून, वेगवेगळ्या पोस्ट करत आहे.