शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

Shiv Sena vs. Eknath Shinde: "राऊत काय बोलतील त्यांचं त्यांना ठावूक", मारहाणीच्या आरोपावर बंडखोर संजय शिरसाट स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 10:08 IST

Shiv Sena vs. Eknath Shinde: गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आता प्रसार माध्यमांना दूरध्वनीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

Shiv Sena vs. Eknath Shinde: गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आता प्रसार माध्यमांना दूरध्वनीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजत राऊत यांनी आमदारांना करण्यात आलेल्या मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. शिवसेनेच्या आमदारांना जबरदस्तीनं सूरतला डांबण्यात आलं आहे आणि त्यांना मारहाण करण्यात येत आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत विचारण्यात आलं असता सध्या गुवाहाटीमध्ये असलेले आमदार संजय  शिरसाट यांनी राऊतांचा दावा फेटाळून लावला. राज्यातील राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा

"आमदारांना मारुन वगैरे कसं ठेवता येईल. आमदार म्हणजे काय छोटा माणूस असतो का त्यांना डांबून ठेवायला? संजय राऊत काय बोलतील त्यांचं त्यांना ठावूक आणि त्यांना अशी माहिती कुठून मिळते हे देवच जाणे", असं आमदार संजय शिरसाट म्हणाले. तसंच आम्ही सर्वजण आमच्या मर्जीनं आणि एकदिलानं इथं उपस्थित आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं, पण तोवर डोक्यावरुन पाणी गेलंय- बच्चू कडू 

आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती समोर आली होती. त्याबाबतही माहिती देताना संजय शिरसाट यांनी नितीन देशमुख यांची प्रकृती एकदम उत्तम असून ते आनंदी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशीही बोलणं झालं आहे, असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं. शिंदेंसोबत गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेचे ३५ आणि अपक्ष ५ आमदार असे एकूण ४० आमदार असल्याची माहिती देखील शिरसाट यांनी दिली. तसंच दुपारपर्यंत हा आकडा ४६ ते ५० पर्यंत जाईल असाही दावा शिरसाट यांनी केला आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी"आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी आहे. नेतृत्वावर नाराजीचा प्रश्नच नाही. पुढे काय करायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मधला काळ कोरोनात गेला आणि उद्धव साहेबांची तब्येत देखील ठिक नव्हती. त्यामुळे अडीच वर्ष गेली. आता एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला असावा आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत", असं संजय शिरसाट म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाट