शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्याचा विचार; संजय शिरसाटांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:47 IST

सिडकोच्या पुढील व्यवस्थापकीय बैठकीत अनेक जाचक अटी शिथील करण्याचा विचार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली. 

नवी मुंबई - सिडको घरांसाठी अनेक जाचक अटी शिथिल करण्याबाबत सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी संकेत दिले आहेत. त्यात एक घर असतानाही दुसरे घर घेण्याची अट काढण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. लवकरच बोर्ड बैठकीत यावर निर्णय होतील अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. 

संजय शिरसाट म्हणाले की, खारघर ठिकाणी असलेल्या घरांची किंमत जास्त आहे. सिडकोच्या घरांची काही ठिकाणी किंमती कमी झाल्या पाहिजेत. सिडकोचा यात थोडं नुकसान होईल परंतु सर्वसामान्य माणसांना कर्ज घेताना अडचणी निर्माण होतात. पुढच्या बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही दरांबाबत चांगला निर्णय घेऊ. सिडकोची घरे घेताना भरपूर अटी आहेत. एखाद्याचं एक घर असताना त्याला दुसरं घर घेता येत नाही ही अट कशासाठी हवी, कुटुंबाचा विस्तार होत असतो. वडिलांनी घर घेतलं तर मुलाला घर घेता येत नाही या अटी शिथिल झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय डोमेसाईल प्रमाणपत्राच्या बाबतीत जी अट आहे तो १५ वर्षाचा रहिवासी असावा. त्याचे मतदान कार्ड आहे, आधार कार्ड, तो इथं शाळा शिकलेला आहे. सर्व इथं झालंय पण त्याला घर घेता येत नाही. कुणालाही घर घेता यावे असं धोरण असावं अन्यथा इथला जो मूळ आहे तो आणखी बाहेर फेकला जाईल. आम्ही मराठी माणसांबद्दल बोलायचे पण तो लांब फेकला जातो. एकीकडे सहानुभूती दाखवायची आणि त्याला लांब फेकायचे हे बरोबर नाही. त्या अटीही शिथिल करण्याचा प्रयत्न करू असं शिरसाट यांनी सांगितले. 

सिडकोचे घर सामान्यांच्या आवाक्याबाहेर! 

सिडकोने विविध नोडमधील गृह प्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती मंगळवारी रात्री जाहीर केल्या.  नोडनिहाय २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत आहेत. सिडकोने माझे पसंतीचे सिडको घर या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता २६ हजार घरांची योजना जाहीर केली होती. यात तळोजा, खारघर,  बामणडोंगरी, खारकोपर, कळंबोळी, पनवेल आणि वाशी येथील गृह प्रकल्पांतील घरांचा समावेश आहे. खारघर नोडमध्ये तीन ठिकाणच्या घरांचा या योजनेत समावेश केला आहे. यापैकी सेक्टर २ ए येथील घरांच्या किमती सर्वाधिक म्हणजेच ९७ लाख इतक्या आहेत. त्यापाठोपाठ वाशीतील ट्रक टर्मिनलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या घराची किंमत ७४ लाख इतकी आहे.   

टॅग्स :cidcoसिडकोSanjay Shirsatसंजय शिरसाट