शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

ED ही दहशतवादी संघटना, संजय राऊतांची खळबळजनक टीका; भाजपावरही घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 10:15 IST

जिथं कसाब होता तिथेच मी होतो. आर्थर रोड जेलमध्ये मतदान घेतले असते तर ९० टक्के मते शिवसेनेला मिळाली असती असंही राऊत म्हणाले.

मुंबई – १०० भ्रष्टाचारी गोळा करायचे अन् त्यांना पक्षात आणायचे हे कुठलं बहुमत? याला बहुमत नाही तर व्यापार म्हणतात. ईडी ही दहशतवादी संघटना, बापाचं घर असल्यासारखं आपल्या घराचा ताबा घेतात. शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आली नाही तर शिवसेना महाराष्ट्रासाठी, लोकांसाठी संघर्ष करण्यासाठी जन्माला आलीय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका भाजपावर केली आहे.

शिवसेना पॉडकास्टमध्ये संजय राऊतांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात राऊत बेधडकपणे भाष्य करताना दिसतात. संजय राऊत म्हणतात की, मराठी माणूस ज्याला तुम्ही घाटी, कोकणी म्हणून हिणवत होता त्या माणसाला प्रतिष्ठा म्हणून शिवसेना स्थापन झाली. मित्रपक्षाने फसवले म्हणून शिवसेना थांबली का? संपली का?, हे जे कोणी बोलातयेत ते माझ्या भाषेत चुXX आहेत असंही त्यांनी म्हटलं.

तसेच शिवसेना अग्निकुंड आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची संघटना नक्कीच दोन पाऊले पुढे नेली. भाजपानं ज्यापद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली त्यांना क्षमा नाही. महापालिका निवडणुका नाहीत. लोकसभा घेतील का नाही माहिती नाही. हे लोक जनतेला घाबरतात आणि जे जनतेला घाबरतात तो नेता नाही असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

दरम्यान, जिथं कसाब होता तिथेच मी होतो. आर्थर रोड जेलमध्ये मतदान घेतले असते तर ९० टक्के मते शिवसेनेला मिळाली असती. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. लोकांच्या संघर्षासाठी जन्माला आली. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल असा दावाही संजय राऊतांनी केला आहे. शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी राऊतांची ही मुलाखत घेतली आहे. त्यातून संजय राऊत बिनधास्त सर्व प्रश्नांना उत्तरे देताना पाहायला मिळत आहे. आवाज कोणाचा, शिवसेनेचा या पॉडकास्टवर १० आणि ११ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजता ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा