शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: 'तुम्हाला हे अधिकार कुणी दिले?', राऊतांनी दीपाली सय्यद यांना सुनावलं; ठाकरे-शिंदे भेटीचं केलेलं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 10:48 IST

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकारी दिपाली सय्यद यांच्या एका ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नवी दिल्ली-

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकारी दिपाली सय्यद यांच्या एका ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार असल्याचं ट्विट करुन दिपाली सय्यद यांनी नवा ट्विस्ट राज्याच्या राजकारणात आणला. दिपाली सय्यद यांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राऊत यांनी थेट दिपाली सय्यद यांना विचारपूर्वक ट्विट करण्याचा सल्ला दिला आहे. 

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; दीपाली सय्यद यांचं मोठं विधान, मानले भाजपाचे आभार

"दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. त्या पक्षाचं काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी आहेत. तसंच प्रवक्त्या देखील नाहीत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे", असं संजय राऊत म्हणाले. ते नवी दिल्लीत एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

"शिंदे गट एकत्र येईल की नाही हे येणारा काळ ठरवेल. एकत्रित यावं असं आम्हाला का वाटणार नाही. कारण ते आमचेच सहकारी आहेत. आमचेच मित्र आहेत. ते आज माझ्यावर टीका करत असले तरी ती त्यांची मजबुरी आहे. भाजपामुळे त्यांच्यावर मजुबरी ओढावली आहे. तरीसुद्धा गेली अडीच वर्ष ते आमच्यासोबत सत्तेत होते. त्यांच्या अनेक अडचणी, कामं आम्ही एकत्र केली आहेत. त्यामुळे एकत्रित यावं असं का वाटणार नाही", असंही संजय राऊत म्हणाले. 

मंत्रिमंडळ विस्तारावरुन लगावला टोला"आमचे सात मंत्री होते. पण इथं तर दोनचं मंत्री काम करत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत यांच्यात चर्चा होत आहे. सरकार घटनाबाह्य असल्याची भीती त्यांच्याही मनात आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला जात आहे. आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळेच शपथविधी होऊ शकलेला नाही. आता तुम्ही घटना तुडवायची ठरवलंच असेल तर ती तुमची मर्जी", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतdeepali sayedदीपाली सय्यद