शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, महिलेच्या तिन्ही याचिका फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 08:06 IST

Sanjay Raut : २०१३ व २०१८ दरम्यान केलेल्या तीन तक्रारींवर पोलीस तपास करण्याचे निर्देश द्यावे व झोन ३ च्या पोलीस उपायुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने याचिकेद्वारे केली होती.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राऊत यांच्या वतीने काही गुंड आपली छळवणूक करत होते, तसेच आपल्यावर पाळत ठेवून होते, असा आरोप एका ३९ वर्षीय उच्चशिक्षित महिलेने राऊतांवर केला. मात्र, उच्च न्यायालयाने बुधवारी त्या महिलेची याचिका फेटाळली.२०१३ व २०१८ दरम्यान केलेल्या तीन तक्रारींवर पोलीस तपास करण्याचे निर्देश द्यावे व झोन ३ च्या पोलीस उपायुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने याचिकेद्वारे केली होती.संबंधित महिलेने राऊत यांच्याविरोधात तीन याचिका दाखल केल्या. त्यात हेरगिरी करणे, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखविणे यासारखे आरोप होते. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने या महिलेच्या तिन्ही याचिका  फेटाळल्या.

गैरसमजातून आरोप- संजय राऊत यांनी न्यायालयात महिलेचे सर्व आरोप फेटाळले. याचिकादार महिलेसोबत माझे पूर्वीपासून कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तिला आणि तिच्या पतीला मी पूर्वीपासून ओळखतो. त्या दोघांमध्ये वाद सुरू आहेत आणि त्यात मी पतीची बाजू घेत असल्याचे तिला वाटते. म्हणून, त्या गैरसमजातूनच तिने माझ्याविरोधात विनाकारण आरोप केले आहेत. ती महिला मला माझ्या मुलीसारखीच आहे, असे राऊत यांनी न्यायालयाला सांगितले होते. - मागील सात वर्षांपासून माझी मानसिक छळवणूक सुरू आहे. पोलिसांत तक्रारी दिल्यानंतरही कारवाई होत नाही, असा आरोप करत महिलेने ॲड. आभा सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयात तीन याचिका केल्या होत्या. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHigh Courtउच्च न्यायालय