शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा...", पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊतांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 15:31 IST

Sanjay Raut : आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या पत्रकार परिषदेबाबत एक सूचक विधान केले आहे. 

मुंबई :  शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद होणार असून या परिषदेत कोणाला टार्गेट करतील याविषयी तर्क लावले जात आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

"तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा... हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफ़िल में... अगर हम सच बताने पर उतर आएं तो क्या होगा... आज 4 बजे, शिवसेना भवन", असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर, आज सकाळी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या पत्रकार परिषदेबाबत एक सूचक विधान केले आहे. 

महाविकास आघाडी सरकारवर आरोप करुन स्वत: नामनिराळे राहणाऱ्या भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे मुखवटे उघडे पाडणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत भाजपाच्या नेमक्या कोणत्या नेत्यांबाबत गौप्यस्फोट करणार आहेत, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

याआधी 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर आरोप केले होते. तसेच, भाजपा नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरावरही संजय राऊतांनी बोट ठेवले होते. किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना तुरुंगात टाकणार असल्याचेही संजय राऊत यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटले  होते. तसेच मोहित कंबोज यांच्यावरही संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. 

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरू होता. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात आणि त्यांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत