शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटातून बाहेर पडतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 10:32 IST

विरोध करणाऱ्यांना गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - हसन मुश्रीफ विरोधी पक्षात आहेत. जे एका विचारधारेविरोधात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडतायेत. अनेकांना अटक झाली. हसन मुश्रीफांना तुरुंगात टाकण्याची भाषा काहींनी केली होती. ही भाषा भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याबाबतीतही झाली होती. परंतु ते सत्तेत गेल्याने त्यांना दिलासा मिळतो. विरोधकांवर दबाव टाकण्याचं राजकारण केले जाते. हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटाशी सामना करणारे नेते आहेत. ते या संकटातून बाहेर पडतील असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 

संजय राऊत म्हणाले की, विरोध करणाऱ्यांना गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर सुरू आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होते. काल सुप्रीम कोर्टात मी स्वत: होतो. सुनावणी झाली. दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला त्यानंतर १४ फेब्रुवारी तारीख दिली. कोर्टात कामाचा फार लोड असतो. निवडणूक आयोगासमोरही सुनावणी झाली. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. स्वायत्त संस्थांवर राजकीय दबाव आहे. त्याचा ताणतणाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. पक्षपात आणि नि:पक्षपात हे नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते. देशातील वातावरण फारसं निर्मळ आणि स्वच्छ राहिले नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत देशात २० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिमांची आहे. इतर धर्मीयही लोक राहतात. जर  निवडणुका जिंकण्यासाठी राजकारण करण्यासाठी हिंदू-मुस्लीम असा वारंवार वापर केला तर देश पुन्हा एकदा तुटेल. पुन्हा विभाजनाची स्थिती निर्माण होईल. लोकांच्या मनात भीती निर्माण करून तुम्ही जास्तकाळ राजकारण करू शकत नाही. मोहन भागवत यांनी जे विधान केले त्यावर भाजपा नेत्यांनी विचार करायला हवा असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे ३ तुकडे होणार नाहीतभाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांचे उजवे हात गिरीश महाजन यांनी जळगावात मुख्यमंत्र्यासमोर एक विधान केले. त्यावर सामनानं अग्रलेख लिहिलाय. महाजन काय म्हणाले, शिवसेना फोडणे हे आमचे मिशन होते, ते आम्ही पूर्ण केले त्याचा आम्हाला आनंद आहे. हे विधान मुख्यमंत्र्यांसमोर केले. हे गंभीर आहे. आम्ही पक्षातून बाहेर पडलो ते महाविकास आघाडीमुळे, आम्ही हा निर्णय राष्ट्रवादी आणि शरद पवारांमुळे घेतला हा दावा वारंवार फुटीर गटाकडून केला जातोय. त्यावर गिरीश महाजनांनी पडदा टाकला. शिवसेना आम्ही फोडली. शिवसेना भाजपाला संपवायची होती. शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे ३ तुकडे करता येणार नाहीत. शिवसेना फोडल्याशिवाय त्यात अडथळा येणार नाही असं महाजनांना सूचवायचं होते. भाजपाच्या एका नेत्याने सत्य सांगितले त्याबद्दल गिरीश महाजन यांचे आभार मानतो असा घणाघातही राऊतांनी भाजपावर केला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHasan Mushrifहसन मुश्रीफEknath Shindeएकनाथ शिंदे