शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"संजय राऊत झोपेच्या गोळ्या घेतात अन् स्वप्न बघतात"; भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 22:14 IST

"एकनाथ शिंदे म्हणालेत तुमच्यासोबत येतील त्यांना घेऊन जा, पण तुमच्यासोबत कोणी आलं तर पाहिजे ना.."

BJP vs Sanjay Raut शिर्डी: शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले खासदार संजय राऊत यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला. राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झालं तर नवल वाटू देऊ नका, असं वक्तव्य त्यांनी केलं. या विधानावरून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राऊतांना चांगलंच सुनावलं. 'सध्या राज्यात पूरपरिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे आजच्या घडीला एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा  तिथे मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे', असे अजितदादा म्हणाले. त्यानंतर आता भाजपा नेत्यांनीही संजय राऊतांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. राऊतांना आता झोप लागत नाही. त्यामुळे ते झोपेच्या गोळ्या घेतात आणि स्वप्न पाहतात, असा टोला भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला.

"संजय राऊतांना हल्ली झोप लागत नाही. ते झोपेच्या गोळ्या घेतात आणि स्वप्न बघतात. आमदार, खासदार मंत्रालयात गेले नाहीत तर त्यांच्या भागाचा विकास होईल का? महाराष्ट्राच्या विकासाला निधी लागणार असल्याने एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. महाविकास आघाडीने अडीच वर्षे सत्यानाश केला. आम्हाला आता ट्वेंटी-ट्वेंटी खेळून पाच वर्षाचा विकास दोन वर्षात भरून काढायचा आहे. त्यासाठी केंद्राची मदत लागणारच आहे", असे बावनकुळे म्हणाले.

"तुम्ही कधी दिल्लीवर विश्वास ठेवला नाहीत, त्यामुळे तुम्ही दिल्लीत गेला नाहीत. शिंदे-फडणवीसांची दिल्ली वारी केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी सुरू आहे. आमदार, खासदार सोडून गेले तरी तुमची मुजोरी कायमच आहे. एकनाथ शिंदेंनी मागेच सांगितलं की यातला जो यायला तयार असेल त्याला घेऊन जा. मात्र, तुमच्यासोबत कुणी यायला तर पाहिजे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आता आत्मचिंतनाची वेळ आली आहे. चुका सुधारण्याऐवजी आमदारांबद्दल अपशब्द बोलले जात आहेत. त्याचाच फटका शिवसेनेला बसतोय", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना