शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीत पिवळे दिसते, लवकरच औषध मिळेल, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मिश्कील टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:48 IST

राज ठाकरेंचा अंदाज येणे कठीण

सांगली : संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीत पिवळे दिसते. कावीळ झाल्यावर सारे पिवळे दिसते, तसे झाले आहे. या कावीळवर औषध मिळते, ते लवकरच त्यांना मिळेल, असा मिश्कील टोला जिल्ह्याचे पालकमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी लगावला.सांगली मारुती चौकात भाजप सांगली शहरतर्फे मोदी सरकारच्या ११ वर्षांतील उल्लेखनीय विकासकामांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, संजय राऊत यांची प्रत्येक गोष्टीत छिद्र दिसते. त्यांची नजर पिवळी वाटते. त्यांना कावीळ झाली असून, मला माहिती आहे त्याच्यावर काय औषध आहे. ते औषध मिळेपर्यंत असेच करत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल पंधरा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले असून, अकरा वर्षे काम करीत आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असे मिळून तब्बल २६ वर्षे एका उच्चपदावर राहण्याचा त्यांनी विक्रम केला. भारतात सोडा जगातही असा विक्रम कुणाला करता आला नाही. त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडला आहे. मागील अकरा वर्षांत पंचवीस कोटी लोकांना मोदींनी दारिद्र्यरेषेतून वर आणले. ज्यांना घर नाही, गॅस नाही, नळपाणी नसलेल्या लोकांना मदत केली. नागरिकांना मोफत धान्य, आयुष्मान भारतमधून आरोग्य सुविधा मिळाल्या. झोपडपट्टीपासून ते अंबानीपर्यंत असा एकही घटक नाही, ज्यांना काही मिळाले नाही, अशी मोदींची अकरा वर्षांची कारकीर्द प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे.

राज ठाकरेंचा अंदाज येणे कठीणराज ठाकरे हे वादळी व्यक्तिमत्त्व आहे. वादळाचा जसा अंदाज येत नाही, तसा त्यांचाही अंदाज कोणी सांगू शकत नाही. लवकरच आपल्याला कळेल, वादळाची दिशा काय ते समजेल, असे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.