शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: "शिंदे गटात काय सुरूय याची माझ्याकडे पक्की खबर, वेळ आली की...", संजय राऊत यांचं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 13:22 IST

नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

नाशिक- 

नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे गटात काय सुरू आहे याची पक्की खबर माझ्याकडे आहे. वेळ आली की जबरदस्त स्फोट होईल आणि वस्तूस्थिती समोर येईल, असं महत्वाचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. 

PM मोदींना रावण म्हटलेलं मलाही आवडलेलं नाही, पण...; संजय राऊतांची भाजपाला चपराक

"शिवसेना आजही आहे तिथंच आहे. कारण पालापाचोळा उडून गेल्यानं शिवसेनेला फरक पडत नाही. तुम्ही किती खोके द्या. जनता खोक्याला विकली जात नाही. सध्या शिंदे गटात काय सुरू आहे याची पक्की खबर माझ्याकडे आहे. वेळ आली की सगळं काही सांगेन. योग्य वेळ आली की बरोबर स्फोट होतील आणि तेव्हा वस्तूस्थिती समोर येईल", असं संजय राऊत म्हणाले. 

कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्री अन् सरकारनं जलसमाधी घ्यावी; संजय राऊतांचा घणाघात

'गद्दार' हे त्यांच्या कपाळावर कोरलं गेलंय"ज्या पद्धतीनं दिवार सिनेमात अमिताभ बच्चनच्या हातावर 'मेरा बाप चोर है' कोरलं गेलं होतं. त्याचपद्धतीनं या गद्दारांच्या माथ्यावर गद्दारी कोरली गेली आहे. त्यांची बायका, पोरं आणि नातेवाईक यांच्या पिढ्यानपिढ्यांना गद्दारी लक्षात राहील. जनता कधीच काही विसरत नाही. तुम्ही आताही निवडणूक घ्या शिवसेनाच निवडून येईल", असंही राऊत म्हणाले.

मोदींना रावण म्हटलेलं मलाही आवडलेलं नाही, पण... "गुजरातच्या प्रचारसभेत मोदी हे १०० तोंडाचे रावण आहेत असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले त्यावर रान उठवलं गेलं. देशाच्या पंतप्रधानांना असं रावण संबोधनं मलाही वैयक्तिक पातळीवर पटलेलं नाही. पण मोदींनी याच मुद्द्यावरुन जनतेसमोर अश्रू ढाळले आणि हा गुजरातचा अपमान असल्याचं म्हटलं. मोदींना रावण म्हटल्यावर राज्याचा अपमान होतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यावर महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? म्हणजे मोदींचा झालेला अपमान भाजपाला दिसतो. पण शिवाजी महाराजांचा अपमान दिसत नाही. अशी ही दुटप्पी भूमिका भाजपा घेत आहे", असं संजय राऊत म्हणाले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदे