Sanjay Raut News: जगभरात युद्ध सुरू असताना आपल्या महाविश्वगुरुंनी कोणती भूमिका घेतली नाही. आपले विश्वगुरु केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू या ठिकाणी राजकीय विरोधकांवर शब्दांचे बॉम्ब टाकत होते. यांची हत्यारे काय तर, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचे काम महाविश्वगुरु करत होते. तिकडे जागतिक युद्ध थांबवण्याचे श्रेय चीन आणि पाकिस्तानने घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे अपयश आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
युद्धात मध्यस्थी करण्याचे श्रेय पाकिस्तानला मिळाले. हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला हवे होते. हे श्रेय महाविश्वगुरुंना मिळायला हवे होते की आम्ही युद्ध थांबवले. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचे नेत्यानाहू यांना एका मंचावर आणले. हे श्रेय महाविश्वगुरुंना मिळायला हवे होते. पण तसे घडले नाही, अशी खंत संजय राऊतांनी बोलून दाखवली.
इराणसारखा देश अमेरिकेला शरण गेला नाही
इराणसारखा देश अमेरिकेला शरण गेला नाही. इराणने ३५ दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिका आणि इस्रायलला झुंजवत ठेवले. या दोन देशांबाबत जी भीती होती, ती इराणने मोडून काढली. देशासाठी कसे लढावे? राज्यकर्त्यांनी बलिदान कसे करावे, हे इराणने जगाला दाखवून दिले. इराणचे नुकसान झाले. पण त्यापेक्षा जास्त नुकसान इस्रायलचं झाले. डोनाल्ड ट्रम्पसारख्या एका झुंड राष्ट्र प्रमुखाला धडा शिकवला, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, अमेरिका इराण युद्ध थांबवण्याचे श्रेय चीन आणि पाकिस्तानने घेतले. शांततेच्या संदर्भातील बैठक इस्लामाबादला होणार आहे. इस्लामाबाद ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होतात, भाजपाचा झेंडा फडकवणार होतात, तिथे आता ट्रम्प, नेत्यानाहू, इराणचे नेते बसून शांती चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आणि भारतासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान आणि चीनला थँक्यू म्हणत असतील तर ही भारताला मारलेली चपराक आहे, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
Web Summary : Sanjay Raut criticizes Modi's inaction during global conflicts, pointing to China and Pakistan receiving credit for the Iran deal. He accuses the government of undermining democracy while Iran displayed resilience against the US and Israel. Raut calls it shameful for India as Trump thanks China and Pakistan.
Web Summary : संजय राउत ने वैश्विक संघर्षों के दौरान मोदी की निष्क्रियता की आलोचना की, ईरान समझौते का श्रेय चीन और पाकिस्तान को दिया। उन्होंने सरकार पर लोकतंत्र को कमजोर करने का आरोप लगाया, जबकि ईरान ने अमेरिका और इजरायल के खिलाफ लचीलापन दिखाया। राउत ने इसे भारत के लिए शर्मनाक बताया क्योंकि ट्रंप ने चीन और पाकिस्तान को धन्यवाद दिया।