शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: विधिमंडळ चोरमंडळ: संजय राऊतांनी माफी मागितली नाहीतर...; धनखडांकडे कारवाईचा प्रस्ताव जाणार

By यदू जोशी | Updated: March 2, 2023 06:59 IST

संजय राऊत यांना शिक्षेचा अधिकार फक्त राज्यसभेला, दोन्ही सभागृहांना अधिकारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खा. संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याच्या मुद्द्यावरून रणकंदन माजले असताना आणि त्यांना तत्काळ शिक्षा करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाने केली असताना राऊत यांना शिक्षा करण्याचा अधिकार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना नाही. ते राज्यसभा सदस्य असल्याने हा विषय आता राज्यसभा सभापतींकडे निर्णयार्थ जाईल.

 विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे राऊत हे सदस्य नाहीत. ते राज्यसभा सदस्य आहेत. त्यामुळे नियमानुसार आता त्यांच्यावरील कारवाईचा विषय राज्यसभा सभापतींकडे (उपराष्ट्रपती) जाईल. राऊत यांनी हक्कभंग केला आहे, असे विधानसभा अध्यक्षांना चौकशीअंती वाटले तर ते त्यांचे मत राज्यसभा सभापतींकडे पाठवतील. राऊत यांनी केलेल्या विधानाची आपण कशा पद्धतीने पडताळणी केली आणि आपल्याला त्यात काय तथ्य आढळले हे देखील ते कळवतील. याच पद्धतीने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे त्यांचा अहवाल राज्यसभा सभापतींकडे पाठवतील. 

 संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (टप्पा २) १३ मार्चपासून सुरू होणार आहे. राज्यसभेच्या सभापतींना आवश्यकता भासली, तर ते हक्कभंगाचे हे प्रकरण आगामी अधिवेशनात विचारार्थ घेतील. त्यानंतर ते राज्यसभेच्या हक्कभंग समितीकडे पाठवू शकतील. हक्कभंग समिती जी शिफारस करेल ती राज्यसभेत मांडली जाईल आणि त्यावर मग राज्यसभा सभापती आपला निर्णय देतील. त्यापूर्वी सभागृहात या विषयावर चर्चादेखील होऊ शकेल.

माफी मागितली तर...खा. राऊत यांनी केलेल्या विधानाबद्दल स्वत: माफी मागितली तर त्यांच्या  हक्कभंग  प्रकरणावर पुढील  प्रक्रिया न करण्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष वा विधान परिषद उपसभापती घेऊ शकतात. राऊत यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी प्रचंड आग्रही भूमिका दोन्ही सभागृहांमधील सत्तापक्ष सदस्यांनी घेतली आहे. त्यामुळे केवळ माफीवर राऊत यांना अभय देऊ नये, अशी भूमिका सत्तापक्षाचे सदस्य रेटतील, अशी शक्यता अधिक आहे.

नियम काय सांगतो?nराऊत यांच्या विधानासंबंधीचे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठविण्याची मागणी दोन्ही सभागृहांतील सत्तारूढ पक्ष सदस्यांनी केली आहे. मात्र, राज्यसभा सदस्यांसंबंधीचे हक्कभंगाचे प्रकरण राज्यसभा सभापतींकडे पाठविले जाते. nराज्यसभा सदस्यांनी केलेल्या हक्कभंगाचा विषय हा राज्यसभेच्या हक्कभंग समितीच्या अखत्यारित येतो. विधिमंडळ हक्कभंग समितीने अहवाल दिला तरी निर्णयासाठी राज्यसभा सभापतींकडेच जाईल, असे माजी विधानमंडळ सचिव अनंत कळसे यांनी स्पष्ट केले.

कारवाईचा चेंडू उपराष्ट्रपतींकडेअध्यक्ष व उपसभापतींनी नियमांनुसार त्यांचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी राज्यसभा सभापतींकडे पाठविणे नियमांनुसार अपेक्षित आहे तरीही सत्ता पक्षाच्या आग्रहाखातर राऊत यांचे प्रकरण हक्क विधिमंडळाच्या हक्कभंग समितीकडे पाठवण्याची भूमिका घेतली गेली तरीही प्रत्यक्ष कारवाईचा चेंडू हा राज्यसभा सभापतींच्या कोर्टातच जाईल.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतvidhan sabhaविधानसभाRajya Sabhaराज्यसभा