शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या ‘पुतिन’कडून दररोज ‘मिसाइल’चा मारा; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टाेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 06:12 IST

‘लोकमत’ पत्रमहर्षी पुरस्कार सोहळ्यात केंद्र सरकारवर केली खरमरीत टीका 

नागपूर : ‘रशिया-युक्रेनप्रमाणे आपल्या देशात प्रत्यक्ष युद्ध सुरू नसले तरी आमच्यासारख्यांना दररोज युद्धाचा अनुभव येत आहे. दिल्लीतील ‘पुतीन’ आमच्यावर रोज ईडी, सीबीआय आदी केंद्रीय यंत्रणारुपी ‘मिसाइल्स’चा मारा करीत आहेत. आम्ही त्यांच्या हल्ल्यापासून वाचलो आहोत,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली.  ‘लोकमत’तर्फे देण्यात येणाऱ्या पत्रपंडित पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात राऊत बोलत होते.पत्रकारिता भयाखाली देशात तटस्थ पत्रकारिता कुठेतरी भयाच्या छायेखाली आहे; परंतु ‘लोकमत’सारख्या वृत्तपत्रांनी देशाला नेहमीच दिशा दिली आहे. मराठी पत्रकारिता कुणापुढे वाकत नाही व ती झुकतदेखील नाही. हीच परंपरा पुढेही निश्चितपणे कायम राहील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.सकारात्मक पत्रकारिता ही काळाची गरज : दर्डा‘लोकमत’ने नेहमी जनसामान्य, शोषित, वंचितांचा आवाज उंच करणारी व त्यांना न्याय मिळवून देणारी पत्रकारिता केली आहे. सकारात्मक व समाजहिताची पत्रकारिता ही काळाची गरज आहे व ती आणखी दर्जेदार झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अगदी ग्रामीण पत्रकारांनादेखील मंच मिळावा, यासाठी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रेरणेतून हे पुरस्कार सुरू झाले. संपादकांच्या नावाने पुरस्कार देणारे ‘लोकमत’ एकमेव वृत्तपत्र असून, निर्भीड व समाजाभिमुख पत्रकारितेची परंपरा कायम राहील, असा विश्वास ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत