शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

संजय पांडे यांना पोलीस महासंचालक करा - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 4:11 AM

सेवाज्येष्ठता असतानाही अपर पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पदावनत केल्याबद्दल राज्य सरकारला फटकारत त्यांना महासंचालकपदी बढती द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला

जमीर काझीमुंबई : सेवाज्येष्ठता असतानाही अपर पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पदावनत केल्याबद्दल राज्य सरकारला फटकारत त्यांना महासंचालकपदी बढती द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. त्यांचा दोन वर्षे आठ महिन्यांचा गैरहजेरीचा सेवा कालावधी असाधारण रजा नियमित करीत २०१२ पासून अपर महासंचालक म्हणून गणण्याची सूचना केली आहे. त्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे.हंगामी मुख्य न्यायाधीश न्या. विजया ताहिलरमानी व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दिलेल्या या आदेशामुळे गृह विभागाची मोठी नाचक्की झाली आहे. या आदेशामुळे पांडे यांची सेवाज्येष्ठता आता महाराष्टÑ सुरक्षा मंडळाचे संचालक संजय बर्वे यांच्याहून अधिक ठरणार आहे. तत्कालीन राज्य सरकारने गृहीत धरलेला १४ वर्षांपूर्वीचा गैरहजेरीचा कालावधी या सरकारने रद्द करीत २९ आॅक्टोबर २०१६ रोजी रद्द करीत २ वर्षे ८ महिन्यांचा कालावधी ‘असाधारण रजा’ केला होता. पांडे यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अ‍ॅड. नवरोज सिरवई व अ‍ॅड. रणवीर सिंह यांनी त्यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली.१९८६ च्या बॅचचे आयपीएस असलेल्या संजय पांडे यांनी १२ एप्रिल २००० रोजी तत्कालीन राज्यकर्त्यांशी मतभेद झाल्याने राजीनामा देत परदेशात खासगी नोकरी पत्करली होती. मात्र सरकारने राजीनामा मंजूर न केल्याने पांडे यांनी तो पुन्हा मागे घेत १ जुलै २००२ रोजी पुन्हा सेवेत दाखल होण्याची इच्छा दर्शविली. केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण (कॅट) व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्याचप्रमाणे राज्य सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचा १२ एप्रिल २००० ते ३० जून २००२ हा कालावधी सेवेत गृहीत धरला होता. मात्र या सरकारने पुन्हा त्याबाबत बदल करीत ती ‘असाधारण रजा’ ठरविली होती. सरकारने ९ वेळा वेगवेगळी दिलेली कारणे खंडपीठाने ती अयोग्य ठरवली.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिस