शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 17:31 IST

Sanjay Nirupam News: काँग्रेसकडून इच्छुक उमेदवाराचा ठाकरे गटाने पत्ता कट केल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.

Sanjay Nirupam News: लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असली तरी काँग्रेसमधील मानापमान आणि नाराजी नाट्य संपताना दिसत नाही. सांगलीच्या जागेवरून आधीच काँग्रेसमध्ये नाराजी असून, दुसरीकडे आता उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते नसीम खान यांनी प्रचारात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून संजय निरुपम यांनी महाराष्ट्र काँग्रेसबाबत मोठा दावा केला आहे. 

उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर नसीम खान यांनी ४८ जागांपैकी एकाही जागेवर मुस्लिम समजाचा उमेदवार दिला नाही, याबाबत नाराजी व्यक्त करत प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. तसेच पत्र काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पाठवले. यानंतर वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची भेट घेतली. या प्रकारावर संजय निरुपम यांनी एक्सवर एक पोस्ट करत मोठे विधान केले.

महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको

उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेवर एक नेता होता. त्यालाही पक्षाने नाराज केले. काँग्रेसच्या मुस्लिम मतांवर डोळा ठेवून असलेल्या ठाकरे गटाने या नेत्याचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटासमोर पूर्णपणे नतमस्तक झाली आहे. ठाकरे गटाला शरण गेला आहे, असे मागेच म्हटले होते. आता उद्या जर महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रातील दीड कोटी मुस्लिम समाज काँग्रेसचा मतदार आहे. मात्र, संपूर्ण मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज आहे. तसेच मुस्लिम समाज काँग्रेसशी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे, असा दावा संजय निरुपम यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे. 

दरम्यान, प्रश्न वर्षा गायकवाड यांचा नाही. अल्पसंख्यांक समाजात उद्रेक आहे. म्हणून प्रचार समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. माझ्यावर समाजाचा दबाव खूप आहे.  वर्षाताई गायकवाड माझ्या बहिणीसारखी आहे. पण, ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. अल्पसंख्यांक समाजाला कोणाच्या सांगण्यावरून दुर्लक्षित केले, ते पाहावे लागेल. वेळ आल्यावर पक्षश्रेष्ठींना सांगेन. राजीनाम्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया नसीन खान यांनी दिली. 

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४