शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयात महिलांसाठी बसवले सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 16:23 IST

अंधेरी पश्चिम येथील मुंबई महापालिकेच्या के (पश्चिम) विभाग कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आणि नागरी कामांसाठी येथे येणाऱ्या महिलांच्या सुविधेसाठी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी नि:शुल्क सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून दिली आहेत.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : अंधेरी पश्चिम येथील मुंबई महापालिकेच्या के (पश्चिम) विभाग कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आणि नागरी कामांसाठी येथे येणाऱ्या महिलांच्या सुविधेसाठी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी नि:शुल्क सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून दिली आहेत. सदर मशीनचे अनावरण त्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पालिका विभाग कार्यालयात काम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवण्याची ही पहिलीच घटना आहे.यावेळी येथे झालेल्या कार्यक्रमात वॉर्ड क्रमांक ६०चे भाजपा नगरसेवक व के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर आणि वॉर्ड क्रमांक ६३च्या भाजपा नगरसेविका रंजना पाटील, के- पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड, प्रशासकीय अधिकारी नंदिनी खरे,  महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमदार डॉ. लव्हेकर यांनी महिला पालिका कर्मचाऱ्यांशी संवाद साधत मासिक पाळीबद्दल खुलेपणाने चर्चा करा, मुलींपेक्षा पौगंडावस्थेतील मुलांवर पाळी आणि महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत संस्कार करण्याचे प्रतिपादन केले.गेल्या २५ वर्षांपासून स्त्री-भ्रूणहत्या, मुलींचे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, मासिक पाळीतील स्वच्छता आदी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम मी करतेय. आज केवळ १५ % स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन पॅड वापरायला मिळतात. मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता न राखल्यामुळे सर्व्हिकल कॅन्सरचा धोका बळावतो. आमच्या 'ती फाऊंडेशन'द्वारे ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आंबोली आणि वर्सोवा पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालय या विविध ठिकाणी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किट बसवून देण्यात आली असून, त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी मी ही मशीन उपलब्ध करून देत असून वरिष्ठ पुरुष अधिकाऱ्यांनीही महिलांच्या या गरजेकडे डोळस नजरेने पाहावे, असे वक्तव्य त्यांनी केले.यावेळी आपल्या भाषणात साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी आमदार डॉ. लव्हेकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. जेव्हा एखादी महिला कर्मचारी सुट्टी घेते तेव्हा त्याचे नेमके कारण कळत नाही, कारण या गोष्टींविषयी उघडपणे बोलले जात नाही. त्यामुळे पुरुष सहकाऱ्यांना याबद्दल माहिती करून देणं आवश्यक आहे. हे मशीन आणि सॅनिटरी पॅड नि:शुल्कपणे उपलब्ध करून दिले त्याबद्धल त्यांनी आभार मानले. आता येथील महिला कर्मचाऱ्यांचे ते त्रासाचे 5 दिवस सुसह्य होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सॅनिटरी व्हेंडिंग मशीनची सुविधा उपलब्धतेसाठी स्मार्ट कार्डचे वाटपही महिला कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

टॅग्स :Mumbaiमुंबई