शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

किशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन अस्मिता योजना : शनिवारपर्यंत नोंदणीचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 21:01 IST

किशोरवयीन विद्यार्थिनींसह ग्रामीण भागातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

अमरावती : किशोरवयीन विद्यार्थिनींसह ग्रामीण भागातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीवजागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वर्षे या वयोगटातील मुलींची माहिती उपलब्ध करण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर मागणी नोंदविणे आवश्यक आहे. याकरिता या मुलींची माहिती मागविण्यात आली आहे. सदर माहिती ‘आपले सेवा’ केंद्रामार्फत अ‍ॅपमध्ये भरावयाची आहे. ही बाब विचारात घेऊन आपापल्या जिल्ह्यातील जि.प. शाळांमधील ११ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींची माहिती मुख्याध्यापकांकडून घ्यावी व ती माहिती ‘आपले सेवा’ केंद्रचालकांकडे उपलब्ध करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिका-यांना निर्देश द्यावेत, अशी सूचना शासनाचे अवर सचिव अनिल काळे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. 

अंमलबजावणी अनिवार्य -योजनेची अंमलबजावणी विहित कालावधीत सुरू करावयाची असल्याने सीईओंनी व्यक्तिश: लक्ष घालून किशोरवयीन मुलींची माहिती १० फेब्रुवारीपर्यंत संकलित करावी व ती ‘आपले सेवा’ केंद्राच्या चालकांकडे उपलब्ध होईल, याबाबत कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.