समृद्धी महामार्ग : ५,२८३ कोटींचा मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला!

By अतुल कुलकर्णी | Published: June 30, 2018 06:16 AM2018-06-30T06:16:30+5:302018-06-30T06:16:41+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा बनवलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे काम ८६ टक्के पूर्ण झाले

Samrudhiyi Highway: Rs 5,283 crore was given to the farmers for reimbursement! | समृद्धी महामार्ग : ५,२८३ कोटींचा मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला!

समृद्धी महामार्ग : ५,२८३ कोटींचा मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला!

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा बनवलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे काम ८६ टक्के पूर्ण झाले असून त्यापोटी २०,६६६ शेतकºयांना तब्बल ५,२८५.९४ कोटी रुपयांचे वाटपही पूर्ण झाले आहे. उर्वरित १४ टक्के भूसंपादनाचे कामही १५ जुलैच्या आत पूर्ण होणार आहे.
‘लोकमत’शी बोलताना एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार म्हणाले, वाशिम, अमरावती, नागपूर या तीन जिल्ह्यांत भूसंपादनाचे काम ९० टक्केपेक्षा जास्त झाले आहे. एकूण १६पैकी १३ मार्गांवरच्या निविदा उघडल्या गेल्या असून तेही काम आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे नागपूरमधील हिंगणा, सेलू तर वाशिममधील करंजा, मंगरुळ, बुलडाण्यातील मेहकर आणि ठाण्यातील शहापूर या चार मार्गांचे प्रशासकीय काम पूर्ण झाले आहे. आता फक्त त्या भागात काम सुरू करण्याचे बाकी आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई समद्धी मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. कोणत्याही परिस्थितीत मार्च २०१९पर्यंत सर्वच्या सर्व १६ ठिकाणी एकाचवेळी काम सुरू झाले पाहिजे यासाठी अधिकाºयांनी काम करावे, अशा स्पष्ट सूचनाच देण्यात आल्याचे ते म्हणाले.
आजपर्यंत शासनाची ७३५.२१ हेक्टर आणि वनविभागाची ५५३.५८ हेक्टर अशी एकूण १२८८.७९ हेक्टर जमीन या कामासाठी एमएसआरडीसीने ताब्यात घेतली आहे. यासाठी २०,६६६ शेतकºयांसोबत १०५५९ खरेदीखत करण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

कोठे किती भूसंपादन व किती मिळाला मोबदला?
जिल्हा संपादित करायचे संपादित क्षेत्र (हेक्टर) मोबदला
खाजगी क्षेत्र (कोटी रु.)
बुलडाणा ११३६.८३ १०००.३६ ६१३.६७
औरंगाबाद १२१७.९१ ९३८.०६ ११९०.०८
वाशिम ९८८.२५ ९१०.६७ ३९७.३२
नाशिक ११०८.२२ ८१३.६९ ८७६.२६
अमरावती ७९७.१६ ७२३.१६ २८५.६९
वर्धा ६००.६६ ५२१.८७ ३७०.००
ठाणे ४९३.१८ ३६३.६४ ५९७.८३
जालना ४३४.७१ ३३४.६६ ३७३.०१
अहमदनगर ३११.९२ २६४.१४ २८३.४३
नागपूर २०२.०३ १८७.४९ २९३.६५

Web Title: Samrudhiyi Highway: Rs 5,283 crore was given to the farmers for reimbursement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.