शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या कंत्राटदाराला भरावाच लागणार ३२८ कोटी रुपयांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 07:49 IST

अवैध उत्खनन भोवले : सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळले

औरंगाबाद : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या जालना जिल्ह्यातील बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या मॉंटेकार्लो लि. आयर्न ट्रॅंगल या गुजरातच्या कंत्राटदार कंपनीने अवैध गौण खनिज उत्खननापोटी प्रशासनाने ठोठावलेल्या ३२८ कोटी रुपयांच्या दंडाविरुद्ध केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले असून, या कंपनीला तहसीलदारांनी केलेला हा दंड आता भरावाच लागणार आहे. 

समृद्धी महामार्गाचे जालना जिल्ह्यातील कंत्राट मॉंटेकार्लो लि. आयर्न ट्रॅंगल या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीने तब्बल दोन वर्षे जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून मुरूम, माती तसेच वाळूचे बेकायदा उत्खनन केले होते. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी चौकशी समिती नेमली होती. जालना तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि बदनापूरच्या तत्कालीन तहसीलदार छाया पवार यांनी संयुक्तरीत्या प्रत्यक्ष स्थळपाहणी करून दोन्ही तालुक्यांत जवळपास ३२८ कोटी रुपयांचे गौण खनिजाचे परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केल्याचे अहवालात नमूद केले. त्यानुसार हा ३२८ कोटी रुपयांचा दंड कंपनीला आकारण्यात आला होता.

खंडपीठाने याचिका फेटाळल्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे न्यायमूर्ती  संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने ३ डिसेंबर रोजी जालना जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची कारवाई वैध ठरवत कंत्राटदाराची याचिका फेटाळली. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी मॉंटेकार्लो लि. या कंत्राटदार कंपनीच्या एकूण तीन याचिका फेटाळल्या आहेत. 

दंड वसुलीचे आव्हानआम्ही आकारलेला दंड मान्य झाला आहे. आता आमच्यासमोर कंपनीकडून हा दंड वसूल करण्याचे आव्हान असून, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करू.- श्रीकांत भुजबळ, तहसीलदार, जालना

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गSupreme Courtसर्वोच्च न्यायालय