शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Samruddhi Mahamarg: ज्यांचे समृद्धी महामार्गाला नाव ते बाळासाहेबच मागे...; भाजप कार्यकर्त्यांतही रंगली कुजबुज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 07:37 IST

समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे, याचा आपल्याला आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'समृद्धी'च्या लोकार्पण सोहळ्यात सांगितले.

समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे, याचा आपल्याला आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'समृद्धी'च्या लोकार्पण सोहळ्यात सांगितले. लोकार्पणाचा कार्यक्रम एम्सच्या टेम्पल ग्राउंडवर पार पडला. या कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार मोठे कटआऊट लावण्यात आले होते. पहिले कटआऊट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे, तिसरे कटआऊट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कटआऊट सर्वांत शेवटी चौथ्या क्रमांकावर होते. बाळासाहेबांच्या नावाने बांधलेल्या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणात बाळासाहेबांचेच कटआऊट सर्वात शेवटी लावलेले पाहून तेथून जाणारा भाजपचा कार्यकर्ताही आश्चर्य व्यक्त करीत होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी आठ मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविली आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. राज्याच्या 'ईडी' सरकारचे जुनेच मंत्री हिवाळी अधिवेशनात कारभार हाताळणार आहेत. एकीकडे शिंदे गटाचे काही आमदार मंत्रिपदाच्या वेटिंगवर असताना तब्बल आठ मंत्र्यांना नव्याने खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे. शंभूराज देसाई, दादाजी भुसे, संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संदीपान भुमरे व गुलाबराव पाटील या मंत्र्यांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, भाजप, शिंदे गटाचे जे आमदार गत १०० ते १२५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून मंत्री पदाची आस लावून बसले आहेत, त्यांना अजूनही ताटकळत आहे.

(ही कुजबुज कमलेश वानखेडे, गणेश वासनिक यांनी लिहिली आहे.)

बैलगाड्यांचा व्हायरल व्हिडीओ...पंतप्रधानांचा दौरा, समृद्धीचे लोकार्पण आणि या मार्गामुळे होणारी वेळेची बचत याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, सायंकाळनंतर समृद्धी महामार्गाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होऊ लागला. समृद्धी महामार्गावर चक्क बैलबंड्यांची रांग चालत असल्याचे दिसून आले. सुरुवातीला हा दुसऱ्या महामार्गाचा व्हिडीओ वाटला. मात्र, पंतप्रधानांचे कटआउटस् व समृद्धीचे बॅनर्स दिसून आले व नेटीझन्सने यावर भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे