शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 20:33 IST

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातावरून विविध प्रश्नांना तोंड फुटलं आहे

Dada Bhuse on Tolls: कसारा- ठाण्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी पहाटे मोठी दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने 20 मजूर ठार झाले. तर 3 गंभीर जखमी आहेत. क्रेन आणि स्लॅब खाली अनेक जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान, तातडीने मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या आणि डॉग स्कॉड देखील घटनास्थळी पोहचले. गेल्या काही दिवसांपासून टोल आणि रस्त्यांची अवस्था यावर बऱ्याच काथ्याकूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधान केले.

"रात्री 11.30 ते 12 वाजण्याचा सुमारास हा अपघात झाला. पुलाचे काम तयार सुरू असताना हा अपघात झाला आहे. सिंगापूर यंत्रणाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. याआधी 94 पुलाचे काम याच कंपनीने केले आहे. मात्र दु्दैवाने ही घटना शहापूर परिसरात घडली. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू या अपघातात झाले आहेत . 3 जण जखमी आहेत अजून कोणी क्रेन च्या खाली अडकले आहेत का याबाबत शोध सुरू आहे. शोध कार्य झाल्यावर ही घटना कशी घडली याबाबत चौकशी केली जाईल. पण रस्त्याचे काम सुरळीत होईपर्यंत टोल बंद करायचे का नाही याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल", असे अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दादा भुसेंनी दिले. 

"महामार्गाचे काम सुरळीत सुरू आहे घाई घडबड होत आहे हे आरोप चुकीचे आहेत. 2024 पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. अतिशय उच्च तंत्रज्ञान वापरून हे काम सुरू आहे. रात्री आणि दिवसात काय काम करायचे आहे ते पाहूनच सुरू आहे," असे ते म्हणाले.

"1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह करण्याचं निर्णय राज्य सरकराने घेतले आहे. त्याच निर्णयानुसार आज नाशिक मध्ये देखील या सप्ताहाचे उद्घाटन झाले. 131 पेक्षा जास्त योजना महसूल विभागाचे आहेत. या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

"नाशिक मुंबई महामार्गावर खड्डे पडले आहेत. या दोन दिवसात याबाबत मी बैठक घेत आहे. लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे प्रयत्न असेल. या महामार्गावर अनेक कट होते, त्यामुळे देखील ट्रॅफिक होत होते. 22 कट आम्ही आता बंद केले आहेत पोलीस याठिकाणी आता लक्ष देत आहेत. येणाऱ्या 8 दिवसात 50 टक्के तरी ट्रॅफिक कमी होईल. रस्त्याचे काम सुरळीत होईपर्यंत टोल बंद करायचे का नाही याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, कारण हा विषय त्यांचा आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गtollplazaटोलनाका