शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केले', समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:56 IST

'मी जन्माने हिंदू आणि दलित कुटुंबातील आहे. मी आजही हिंदू आहे, धर्म कधीच बदलला नाही.'

नवी दिल्ली: मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी आज निकाहनामा शेअर केला होता, ज्यामध्ये समीर यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले होते.

नवाब मलिकांच्या आरोपांवर समीरने उत्तर दिले की, मी जन्माने हिंदू आहे आणि दलित कुटुंबातून आलो आहे. मी आजही हिंदू आहे. धर्म कधीच बदलला नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. मला दोन्ही आवडतात. माझी आई मुस्लिम होती आणि मी मुस्लिम पद्धतीने लग्न करावे अशी तिची इच्छा होती, म्हणून मी माझ्या आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केलं, अशी महत्वाची माहिती त्यांनी दिली 

नवाब मलिकांना आव्हान...वानखेडे पुढे म्हणाले की, लग्न झाले त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्नाची नोंदणी केली होती. दोन वेगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात, तेव्हा एक विशेष करार असतो, यात धर्म बदलत नाही. काही काळानंतर आमचा कायदेशीर घटस्फोटही झाला आहे. मी जर धर्म बदलला असेल तर नवाब मलिकांनी त्याचे प्रमाणपत्र दाखवावे, असे आव्हानही वानखेडे यांनी दिले.

नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोटनवाब मलिक यांनी समीर वानखेडेशी निगडीत लग्नाचे डॉक्युमेंड आज ट्विटरवर शेअर केले आहेत. हे समीर दाऊद वानखेडेचे लग्न असल्याचे त्यांनी फोटोसोबत लिहिले. तसेच, समीर यांचा विवाह डॉक्टर शबाना कुरेशी यांच्याशी 7 डिसेंबर 2006 रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम मुंबई येथे झाला, होता असे ते म्हणाले. नवाब मलिक यांनी जोडप्याचा फोटोही शेअर केला आहे. 

नोकरीसाठी बनावट कागदपत्र बनवलेयावेळी मलिक यांनी नोकरीसाठी बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोपही केला. समीर वानखेडेचे वडील हिंदू दलित तर आई मुस्लिम असल्याचे नवाब मलिक यांचे म्हणणे आहे. लग्नानंतर वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. जेव्हा कोणी मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करतो तेव्हा त्याचा त्याच्या जुन्या जातीशी काहीही संबंध नसतो. मात्र समीर वानखेडे यांनी आरक्षणाचा वापर केला. बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवून गरिबांच्या हक्कावर गदा आणली, असं मलिक म्हणाले.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिकDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो