शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: संभाजीराजेंकडून 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:34 IST

राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर त्यांनी आज आपल्या पुढील प्रवासाची दिशा ठरवली आहे.

पुणे- 

राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर त्यांनी आज आपल्या पुढील प्रवासाची दिशा ठरवली आहे. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असून स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली. 

'...तर मी लोकसभाही लढवेन तेही कोणत्याही मतदार संघातून'; संभाजी राजे थेट बोलले!

"समाजाला दिशा देण्यासाठी आणि समजाच्या हितासाठीच मी आजवर भूमिका घेत आलो आहे. सहा वर्षात मी कुठेही राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा धुळीस मिळेल असं वागलेलो नाही. जनसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील महत्वाची आहे. त्यामुळे जुलैमध्ये राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होत आहेत. यात मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे", अशी घोषणा संभाजीराजे यांनी यावेळी केली. त्यांनी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन देखील केलं. 

संभाजीराजेंनी भाजपाची साथ सोडली; असे मांडले राज्यसभेच्या मतांचे गणित

"महाराष्ट्राच्या जनतेनं छत्रपती घराण्याला आजवर खूप प्रेम केलं. सत्तेत राहून मी अनेक कामं करू शकलो. समाजहित ज्यात असेल त्याची बाजू मी घेत आलो आहे. महाविकास आघाडी असो किंवा भाजपा असो. ज्यावेळी समाजहित मला जिथं दिसलं तिथं मी बाजू मांडत आलो आहे. त्यामुळे माझं सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन आहे की त्यांनी मला पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यासाठी सहकार्य करावं", असं संभाजीराजे म्हणाले. 

आजपासून मी कुठल्याही पक्षाचा नाही!"मला विश्वास आहे की छत्रपतींच्या घराण्यातील एकमेव माणूस म्हणून मी समाजहितासाठी कामं करतोय. मी आजपासून कुठल्याही पक्षात नाही. मी अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मी कुठल्याही पक्षात जात नाहीय", असं संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केलं. 

'स्वराज्य' नावाच्या संघटनेची स्थापना   "लोकांना संघटीत करण्यासाठी, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी आणि गोरगरीबांचं कल्याण कऱण्यासाठी मी एक संघटना स्थापन करत आहे. या संघटनेचं नाव 'स्वराज्य' असं आहे. या महिन्यातच लोकांची भावना समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे", असं संभाजी राजे म्हणाले. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीBJPभाजपा