शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

शिवरायांच्या गडकिल्ल्यांची दुरवस्था, संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करा, संभाजीराजे छत्रपतींची शिंदे सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 13:23 IST

Sambhaji Raje Chhatrapati: श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे.  श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात की, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात विजयदुर्गची तटबंदी ढासळली होती. पन्हाळगडची तटबंदी अथवा बुरुज ढासळणे, हे तर नेहमीचेच झाले आहे. यावर ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मी झटत आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करून विजयदुर्ग तटबंदीचे काम सुरू करण्यास मंजुरी आणली होती. विशाळगडाच्या तटबंदी संवर्धनाचे काम सुरू केले आहे. रांगणा किल्ल्यासाठी भरीव निधी आणलेला आहे. पन्हाळगडच्या संवर्धनासाठी देखील मी पाठपुरावा करीत आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दुर्गराज रायगडच्या जतन संवर्धनाचे काम जोमाने सुरू आहे. रायगड प्राधिकरणच्या धर्तीवर केंद्राच्या ताब्यात असणारे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा, शिवनेरी यांसारखे किमान १० महत्त्वाचे किल्ले सामंजस्य कराराद्वारे राज्य सरकारकडे देण्यात यावेत, यासाठी सदैव प्रयत्न केले. १५ व्या वित्त आयोगामार्फत गडकोटांसाठी भरीव निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला, ज्याला केंद्राकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

इतक्या वर्षांच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे केवळ तात्पुरते उपाय करून आणि जुजबी डागडुजी करून गडकोटांचे संवर्धन होणार नाही. हा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन व भरीव योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी माझी गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही मागणी आहे की, राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी. विद्यमान राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, ही एक दुर्गप्रेमी म्हणून मी मागणी करीत आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे