शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयतेबाबत हिंदू स्त्री-पुरुष नपुंसक : संभाजी भिडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 10:55 IST

हिंदूंना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हेच कळत नाही, असं भिडे यांनी म्हटलं

जळगाव: हिंदू स्त्री-पुरुष राष्ट्रीयतेबाबत नपुंसक असल्याचं विधान शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलंय. चीन आणि पाकिस्तान हे भारताचे नंबर एकचे शत्रू आहेत, त्यांच्याविरोधात हिंदूंनी एकजुटीने उभं राहण्याची गरज आहे. मात्र हिंदूंना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हेच कळत नाही, असंही ते म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 'देशातील हिंदू स्त्री-पुरूष राष्ट्रीयत्वाच्या कसोटीवर अनुत्तीर्ण आहेत. आपली धरती, परंपरा, संस्कृती, भाषा, धर्म याबाबत टोकाची क्रियाशिलता हिंदूंच्या रक्तात आढळत नाही. हिंदूना स्वार्थापलीकडे काही कळत नाही. ही उणीव दूर केल्याशिवाय आपण राष्ट्र म्हणून उभे राहू शकणार नाही,' अशी घणाघाती टीका संभाजी भिडे यांनी केली. ‘३२ मण सिंहासन व खडा पहारा’ या विषयावर भिडे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत हा जगातील सर्वात संपन्न देश आहे. जपान, चीन, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, तुर्कस्थान, नेपाळ, इराण, इराक, अफगाणिस्तान, अरबस्थान हा सर्व भाग भारतखंडाचा भाग होता. त्यातील बराच भाग गळाला. तरीही भारत जगात लक्षावधी एकर सुपीक जमीन असलेला, मोठ्या संख्येने नद्या असलेला, पशुधन, जलसंपदा असलेला तसेच बुद्धीसंपन्न लोकांचा असा एकमेव देश आहे. जगातील सर्व शास्त्रांचा जन्म भारतात झाला आहे. मात्र आपणच करंटे आहोत. मातृभूमीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव आपल्याला नाही. आपल्याला परदेशाचं आकर्षण वाटतं. मात्र ‘नासा’सारख्या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेच्या ११ जणांच्या संचालक मंडळात १० भारतीय हिंदू आहेत. जिनीव्हातील सर्वोच्च ताकद असलेल्या अणुभट्टीचं संचालन करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये ५३ टक्के हिंदू भारतीय आहेत. संगणक क्षेत्रातील ३७ टक्के शास्त्रज्ञ भारतीय आहेत. मात्र बंगालच्या उपसागरातून (गंगासागर) युरेनियम, थोरीयम असलेल्या भागातून वाळू उपसण्याचा करार अमेरिकेशी केला. १८६२ ते १९८२ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून हे दुर्मिळ मूलद्रव्य नेलं आणि आता आपण त्यांच्याकडे युरेनियम, थोरियमची भिक मागतो, असं भिडे म्हणाले. जगातील १८७ राष्ट्रांमध्ये आपलं व्यवहारस्थान काय? शेकडो हजारो वर्ष परकीयांच्या आक्रमणात असलेला देश. ७६ राष्ट्रांनी आक्रमण केलं, असा भारत हा जगातील एकमेव देश आहे. असं का झालं? कारण हिंदूंच्या रक्तात आपण कोण आहोत? कशासाठी जगायचं? कशासाठी मरायचं? आपला शत्रू कोण? आपला मित्र कोण? याची जाणीवच नाही. असेल तरी स्वार्थापलिकडे जाणीव होतच नाही. हिंदूच्या रक्तात राष्ट्रीयत्वाच्या जाणीवा पेटत्या नसतात, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीHinduहिंदूchinaचीनPakistanपाकिस्तान